Lokmat Sakhi >Fitness > पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

Best Time For Walk For Weight Loss : अनेकजण सकाळी चालायला जातात पण त्यांना चालण्याची योग्य पद्धत माहित नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:48 PM2024-06-01T13:48:40+5:302024-06-01T13:52:53+5:30

Best Time For Walk For Weight Loss : अनेकजण सकाळी चालायला जातात पण त्यांना चालण्याची योग्य पद्धत माहित नसते.

Best Time For Walk For Weight Loss : Which Is Best Time For Walk For Quick Weight Loss | पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

आरोग्य चांगले राहण्यासाठी मॉर्निंग वॉक (Morning Walk) सगळ्यात महत्वाचा मानला जातो. सकाळी वॉक केल्याने  तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता आणि तब्येतही चांगली राहते. (Weight Loss Tips)  खासकरून सकाळच्यावेळी चालल्यास एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्यास मदत होते  वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी  वॉक करायलाच हवं. (Walking Health Benefits) अनेकजण सकाळी चालायला जातात पण त्यांना चालण्याची योग्य पद्धत माहित नसते. तुम्ही सकाळी चालायला जा किंवा संध्याकाळी चालण्याचं योग्य टायमिंग माहीत असेल  तर अजिबात त्रास होणार नाही. (Best Time For Walk For Weight Loss)

सकाळी चालण्याची योग्य वेळ कोणती? (Perfect Time For Walk)

सकाळी वॉक केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याशिवाय ऑक्सिजन लेव्हलही वाढते आणि तुम्हाला भरपूर व्हिटामीन डी मिळते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी 7 ते 9 या वेळेत चालू शकता. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि एस्क्ट्रा कॅलरीज वाढत नाहीत. व्यायाम केल्याप्रमाणेच  तुम्हाला या 2 तासांच्या वॉकचा फायदा होईल.

इव्हिनिंग वॉकचे फायदे (Benefits Of Evening Walk)

सकाळी चालण्याप्रमाणेच संध्याकाळी चालल्यानेही शरीराला बरेच फायदे मिळतात. डिनरनंतर तुम्ही काही वेळ वॉक केला तर  खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होईल आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल याशिवाय शरीरात एक्स्ट्रा चरबी वाढवणार नाही. सकाळी वॉक करण्यापेक्षा संध्याकाळी एक तास  चालल्यानेही शरीर निरोगी राहते.

कितीवेळ वॉक करायला हवं?

एक्सपर्ट्स सांगतात की फिट आणि निरोगी राहण्यासाठी व्यक्तीने दिवसातून त कमीत कमी १० हजार पाऊलं चालायला हवं.  जर तुम्ही दिवसभरात १ तास वॉक करत असाल किंवा ५ ते ७ किलोमीटर चालत असाल तर तुम्ही १० हजार पाऊलांचे टार्गेट पूर्ण करू शकता. ज्यामुळे हृदय निरोगी राहील आणि शरीर लठ्ठपणाच्या कचाट्यात सापडणार नाही. रोज चालल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवत नाहीत, 

Web Title: Best Time For Walk For Weight Loss : Which Is Best Time For Walk For Quick Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.