Join us  

रोज चालूनही पोट कमी होत नाही? 'ही' आहे चालण्याची योग्य वेळ; स्लिम-मेंटेन राहण्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:12 AM

Best Time for Walking : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस, बाइसिल क्रंचेस, रिवर्स क्रंचेस,  प्लँक, माउंटेन क्लाइंबर्स, हँगिंग लेग रेज​ हे उत्तम व्यायाम आहेत.

चालणं हा एक सोपा व्यायाम आहे. जो कोणत्याही वयात केला जाऊ शकतो. वॉकिंगमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. (What is the right time for walking) एक्सपर्ट्स रोज ३० मिनिटं फिजिकल एक्टिव्हिटीज करण्याचा सल्ला देतात. स्लिम पोट आणि ६ पॅक्स असणं आकर्षक पर्सनॅलिटीचे संकेत आहेत. (Best Time for Walking) कोर मसल्स मजबूत करण्यासाठी लोक व्यायाम करतात पण फक्त चालल्यानं एब्स येतात का असाही प्रश्न उपस्थित केला जातो. (The Best Time of Day to Walk and Exercise)

चालणं शरीरासाठी एक उत्तम व्यायामप्रकार आहे. लोअर बॉडी हेल्दी राहते. याशिवाय कोअर मसल्स मजबूत बनतात. कोअर वर्कआऊटकडे तुम्ही लक्ष देऊ शकता.  6 पॅक ऍब्स बनवण्यासाठी तुम्हाला शरीरातील चरबी कमी करावी लागेल आणि ऍब्सचे स्नायू वाढवावे लागतील. त्यासाठी व्यायाम, आहार, झोप, ताणतणाव, हार्मोन्स याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही मुख्य व्यायाम आणि संतुलित आहाराने शरीरातील चरबी कमी करू शकता, ज्यासाठी पुरेशी झोप, कमी ताण आणि संतुलित हार्मोन्स आवश्यक आहेत.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस, बाइसिल क्रंचेस, रिवर्स क्रंचेस,  प्लँक, माउंटेन क्लाइंबर्स, हँगिंग लेग रेज​ हे उत्तम व्यायाम आहेत.  रोज चालल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.  रोज ६ हजारापेक्षा जास्त पाऊलं चालल्यानं वजन वाढ नियंत्रणात राहते, गोड खाण्याचे क्रेव्हीग्सही कमी होतात. सांधेदुखीचा त्रास कमी होतो, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टळतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

रोज किती वेळ चालायचं?

आपण दररोज 30-40 मिनिटे चालणे आवश्यक आहे. डॉक्टरही सांगतात की रोज एवढा वेळ चालल्याने जीवनशैलीतील आजारांपासून संरक्षण  होते. चालणे तुम्हाला अनेक आजारांपासून कसे वाचवू शकते.

चालण्याचा परिणाम मनावरही दिसेल. अभ्यासानुसार, चालण्याने एंडोर्फिन (मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये उपस्थित हार्मोन्स) वाढते आणि तणावाची पातळी कमी होते. यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, धावण्यासारखे चालणे देखील हृदयासाठी चांगले आहे. हे हृदयातील रक्ताभिसरण वाढवते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब स्थिर करते.

संशोधनानुसार, जेवल्यानंतर वॉक केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामुळे शरीरातील चरबी जळते आणि लठ्ठपणा कमी होतो किंवा सकाळी रिकाम्या पोटी चालल्यानं शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होऊ शकतात. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात कधीही चालू शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स