Join us  

वाढलेलं वजन वेगानं कमी होईल; फक्त पाणी पिण्याचं हे Best Timing लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:15 AM

Best Times to Drink Water for weight loss : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी पिण्याच्या योग्यवेळा माहीत असायला हव्यात.

वजन वाढणं, पोट सुटलंय, मांड्यांचं फॅट वाढलंय अशा समस्या आजकाल खूपच कॉमन झाल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएटपासून जीम, झुंबापर्यंत काहीही करण्याची लोकांची तयारी असते आपण फिट, मेंटेन राहावं असं प्रत्येकालाच वाटतं.  (Can You Lose Weight by Drinking Water) वजन वाढण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनातल्या काही चुका, सवयी कारणीभूत ठरतात. (Know The Best Time To Drink Water To Lose Weight)

जर त्यात बदल केला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होऊ शकते.  वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी पिण्याच्या योग्यवेळा माहीत असायला हव्यात. डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार वजन वेगानं कमी होण्यासाठी पाणी पिण्याचे ३ बेस्ट टायमिंग प्रत्येकालाच माहीत असायलाच हवेत. (Is There a Best Time to Drink Water)

१) सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी १ ग्लास गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म वाढतो.

२) जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही २ ग्लास पाणी प्यायलात तर कॅलरी इन्टेक आणि एपेटाईट दोन्ही कमी होते.

३) रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम पाणी प्यायल्यानं हार्मोनल इम्बॅलेंस कमी होतो.

पाणी पिण्याचे फायदे

डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता वाढण्यामागे डिहायड्रेशन हे प्रमुख कारण आहे. मेंदूच्या कार्यासारखी प्रमुख कार्ये करण्यासाठी आणि योग्य पचनासाठी पोटात पुरेसे द्रव तयार करण्यासाठी तुमच्या शरीराला द्रव आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

पाणी तुमचा मेटाबॉलिझ्म रेट वाढवण्यासाठी ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर सक्रिय आहे आणि तुमची चयापचय वाढली आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही दररोज अधिक कॅलरी बर्न करत आहात. 

पाणी शरीराला हायड्रेशनमध्ये मदत करते, लाळ तयार करण्यासाठी ते महत्वाचे आहे. तोंडासाठी लाळ महत्त्वाची आहे कारण कोरड्या तोंडामुळे रोग, तोंडात अल्सर, अयोग्य पचन आणि मधुमेह देखील होऊ शकतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य