Lokmat Sakhi >Fitness > सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

Best Timing for Exercise : जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच लवकर वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात.  

By manali.bagul | Published: November 30, 2022 05:02 PM2022-11-30T17:02:09+5:302022-11-30T18:12:22+5:30

Best Timing for Exercise : जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच लवकर वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात.  

Best timing for exercise : What's the best time of day to exercise explain by master trainer rahul chaudhari | सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

मनाली बागुल

आपण कायम फिट, मेंटेन दिसावं.  पोटावरची, पाठीवरची अतिरिक्त चरबी कमी व्हावी जेणेकरून मनासारखं ड्रेसिंग करता येईल. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट, डाएट, योगा करणारे बरेचजण असतात. महिनोंमहिने व्यायाम करूनही हवातसा रिजल्ट मिळत नाही. तर काहीजण व्यायामामध्ये सातत्य ठेवत नाही. जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच पटकन वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात.  मास्टर ट्रेनर राहूल चौधरी (न्युट्रिशनिस्ट, आर, सी फिटनेस, संचालक) यांनी लोकमत सखीशी बोलताना फॅट लॉस आणि कार्डीओ व्यायामाबाबतचे समज, गैरसमज याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What's the best time of day to exercise explained by master trainer rahul chaudhari)

१) जास्तवेळ कार्डिओ केल्यानं वजन लवकर कमी होतं?

 मास्टर ट्रेनर राहूल सांगतात, ''वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्डिओ करत असाल तर बाहेरच्या वातावरणात करायला हवं. तुम्ही सायकलींग करू शकता किंवा धावायला जाऊ शकता. जीममध्ये ट्रेडमील किंवा सायकलिंग करत  असाल तर १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त करणं टाळायला हवं. डेली रूटीनमध्ये चालणं, शिड्या चढणं अशा एक्टिव्हीज  सुरू ठेवल्यानंही फायदा होतो.''

२) वर्कआऊटनंतर अंगदुखी होत असेल म्हणजे चांगला व्यायाम झालाय, यात कितपत तथ्य?

मास्टर ट्रेनर राहूल यांच्यामते तुम्ही जर महिन्याभरापासून समान वजन उचलत असाल तर मसल्सना त्या वजनाची सवय झालेली असते. अशावेळी मसल्स ब्रेकडाऊन होत नाही, त्यामुळे वेदना जाणवत नाही. जर तुम्ही रिपिटेशन्स वाढवत गेलात किंवा वजन जास्त उचललं तर मसल्स पेन होऊ शकतं.

अनेकदा व्यायामानंतर २ दिवसांनी वेदना जाणवतात हा एक जेनेटिकचाच एक भाग आहे त्यामुळे वेदनांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असू शकते. याला पोस्ट 'वर्कआऊट सोअरनेस' असं म्हणतात. आठवड्यातून ४ ते ५ दिवस व्यायाम केल्यास उत्तम ठरतं. जेणेकरून मसल्स रिक्व्हरीसाठी वेळ मिळतो.

३) फक्त सकाळीच व्यायाम केल्यानं चांगला फायदा होतो? 

 साधारण सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात शरीर खूप एर्नेजिक असतात. यावेळाच क्वचितच झोप लागते. जर तुम्हाला चांगले फॅट लॉस करायचे असेल तर सकाळी व्यायाम करा. कारण रात्री जेवल्यानंतर शरीर फास्टींग मोडला गेलेलं असतं. मसल्समध्ये ग्लायकोजन लेव्हल ड्रॉप झालेली असते. सध्याच्या स्थितीत कामामुळे अनेकांना सकाळी व्यायाम करणं जमत नाही. यावर उपाय म्हणून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वर्कआऊट करा. पण डाएटही पाळलं जायला हवं, झोप पूर्ण होते की नाही हे पाहा.

४) जास्त घाम आला म्हणजे जास्त फॅट लॉस होतं?

वर्कआऊट करताना घुसमट होऊ नये, दम लागू नये, ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित असावी याकडे लक्ष द्या.  तुम्ही मोकळ्या हवेत वर्कआऊट करा किंवा एसीच्या हवेत करा. पण व्हेंटिलेशन व्यवस्थित असायला हवं. 

५) प्रोटिन्स घेण्याची गरज सगळ्यांनाच असते का?

शरीतल्या फक्त मसल्सनाच नाही तर बोन स्ट्रेंथ,  इतर फंक्शनिंगसाठीही प्रोटिन, कॅल्शियम लागतं. म्हणून शरीराच्या मेंटेनंससाठी  ठरलेल्या प्रमाणानुसार प्रोटिन्स खाद्यपदार्थांतून घेतलं जायला हवं. प्रोटिन्समध्ये  क्लास 1 - नॉनव्हेज, क्लास 2 - व्हेज असे दोन प्रकार असतात. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर पनीर, टोफू, शेंगदाणे, सोया हे पदार्थ प्रोटिन्स मिळवण्यासाठी खाऊ शकता. 

Web Title: Best timing for exercise : What's the best time of day to exercise explain by master trainer rahul chaudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.