Join us

केवळ पायी चालून कसं कमी करता येईल सुटलेलं पोट? चालताना लक्षात ठेवा 'या' सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:03 IST

Weight Loss Tips: पोटावरील चरबी कमी करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. पण योग्य पद्धतीने पायी चालूनही तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

Weight Loss Tips: आजकालच्या धावपळीच्या जीवनातील खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि एक्सरसाईजसाठी काढता न येणारा वेळ यामुळे लोकांचं वजन वेगाने वाढत आहे. लठ्ठपणा वाढत असल्याने लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. यातीलच एक सगळ्यात प्रचलित उपाय म्हणजे पायी चालणे. मात्र, पोटावरील चरबी कमी करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. पण योग्य पद्धतीने पायी चालूनही तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

१) वेगाने चाला

जर तुम्हाला वर्कआउट करायचा नसेल तर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पायी चालणे सगळ्यात कॉमन पर्याय आहे. जास्तीत जास्त कॅलरी बर्न करण्यासाठी आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी वेगाने पायी चालणं अधिक गरजेचं आहे. जर तुम्हाला वेगाने पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रोज कमीत कमी ३० मिनिटे वेगाने चालावे. याने हार्ट रेटही सुधारतो.

२) पोश्चरमध्ये सुधारणा

पायी चालताना आपल्या पोश्चरकडे लक्ष द्या. कारण जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी हा एक महत्वाचा नियम आहे. कोरला अ‍ॅक्टिव ठेवत आपले खांदे मागच्या मागे करत सरळ उभे रहावे आणि चालणं सुरू करा. याने मांसपेशी सक्रिय होतात. तसेच शरीर टोन होतं आणि मसल्स मजबूत होतात.

३) चालण्याचा वेळ वाढवा

वेगासोबत हेही महत्वाचं आहे की, तुम्ही रोज किती वेळ पायी चालता. पायी चालण्याची सुरूवात रोज अर्धा तास इतक्या वेळापासून करा. हळूहळू चालण्याची वेळ वाढवण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ चालल्याने हार्ट रेट वाढतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होतात. अशाप्रकारे तुम्ही पोटावरील चरबीही कमी करू शकाल.

४) संतुलित आहार

शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं. संतुलित आहाराने शरीराला ऊर्जा तर मिळतेच, सोबतच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी अधिक वेगाने बर्न होतात आणि वजनही वेगाने कमी होण्यास मदत मिळते. जंक फूड, फास्ट फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळून पौष्टिक पदार्थांवर भर द्या. तेव्हाच तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळेल. 

५) वजन उचला

वॉकिंगची तीव्रता वाढवण्यासाठी तुम्ही पाठीवर बॅकपॅक ठेवू शकता. पाठीवर थोडं वजन वाढवून चालल्याने वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतं. असं केल्यास मांसपेशींना जास्त मेहनत करावी लागेल. ज्यामुळे अधिक कॅलरी बर्न होतील आणि सोबतच पाठीच्या मांसपेशीही मजबूत होतील.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स