वजन (Weight Loss) कमी करण्यासाठी डॉक्टर वॉक किवा ब्रिस्क एक्सरसाईज करण्याचा सल्ला देतात. ब्रिस्क व्यायामात सायकलिंग, स्विमिंग, जंपिग व्यतिरिक्त वॉकिंगचा समावेश असतो. वॉकिंग केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. असे बरेच लोक आहेत जे वॉक करतात पण त्यांचे वजनच कमी होत नाही. प्रत्येकालचा वॉक करण्याची योग्य पद्धत माहित असते असं नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. ज्यामुळे वजन कमी करणं सहज शक्य होईल. ( Walking For Weight Loss Know These 4 Tips On How to Get Started)
स्पीड वॉकिंग
हफिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार न्युयॉर्क स्पेशल सर्जरी रुग्णालयाच्या फिजिकल थेरेपिस्ट टेलर मोल्डोफ यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, प्रत्येक व्यक्तीने आठवड्यात १५० ते ३०० मिनिटं व्यायाम करायला हवा. याचे अनेक फायदे आहेत. रोज ३० मिनिटं एरोबिक व्यायाम पुरेसा ठरतो. पण वॉकिंग योग्य पद्धतीने न केल्यास त्याचा फायदा दिसून येत नाही.
टेलर मोल्डोफ यांच्यानुसार अर्ध्या तासात ५००० किंवा १००० स्टेप्स पूर्ण करायला हव्यात. पायी चालण्याची स्पीड ५ ते ६ किलोमीटर प्रति तास असायला हवी. तुमची हार्ट बीट १०० बीट प्रति मिनिट असायला हवी. तुम्ही या पद्धतीने चालल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
इंटरनल जॉगिंगमध्ये वॉकिंग किंवा जॉनिंगसोबत वेगाने चालण्याचा समावेश आहे. जर तुम्ही खूप वेगाने पायी चालू शकत नसाल तर संथ गतीने चाला. १ मिनिट तुम्ही संथ गतीने चाला. त्यानंतर ३० सेकंदानंतर वेगानं चाला. एक मिनिटं सामान्य स्थितीत चाला. हळूहळू ३० सेकंद वाढवून १ मिनिटापर्यंत घ्या. १ मिनिटं स्पीडने चालल्यानंतर पुन्हा सामान्य स्पीडने चाला. याला इंटरनल जॉगिंग म्हणतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येतं. स्ट्रॅथ ट्रेनिंगमध्ये पुशअप्स, वजन वाढणं, स्वाट्स आणि इतर व्यायामांचा समावेश करा.
दिवसेंदिवस नजर कमजोर होतेय-लांबच दिसत नाही? ५ गोष्टी करा, नजर होईल तेज
उंच ठिकाणी वॉक करा
उंच ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी हा वॉक सामान्य आहे. पण जे लोक मैदानी भागात राहतात त्यांच्यासाठी वॉक करण्यासाठी उंच जागा शोधावी लागेल. वॉकिंग प्लॅटफॉर्म हळूहळू वाढवत जा. यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. ट्रेडमिलवर धावताना ट्रेडमिल इन्क्लाईनचा वापर करू शकता.