Lokmat Sakhi >Fitness > दंड फार जाडजूड दिसतात? आहारातून ३ पदार्थ करा बाद, दंड होतील बारीक-हात दिसतील सुंदर

दंड फार जाडजूड दिसतात? आहारातून ३ पदार्थ करा बाद, दंड होतील बारीक-हात दिसतील सुंदर

Best Ways to Lose Arm Fat : अनहेल्दी खाणंपिणं- चुकीचं डाएट यामुळे  शरीराची चरबी वाढत जाते.  (Best Ways to Lose Arm Fat)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:20 AM2023-08-10T09:20:00+5:302023-08-10T16:32:49+5:30

Best Ways to Lose Arm Fat : अनहेल्दी खाणंपिणं- चुकीचं डाएट यामुळे  शरीराची चरबी वाढत जाते.  (Best Ways to Lose Arm Fat)

Best Ways to Lose Arm Fat : How To Reduce Arm Fat Quickly exercises to reduce arm fat | दंड फार जाडजूड दिसतात? आहारातून ३ पदार्थ करा बाद, दंड होतील बारीक-हात दिसतील सुंदर

दंड फार जाडजूड दिसतात? आहारातून ३ पदार्थ करा बाद, दंड होतील बारीक-हात दिसतील सुंदर

जेव्हा वजन वाढतं तेव्हा पोटासह, कंबर दंडाचीही चरबी वाढू लागते.  इतर अवयवांच्या तुलनेत दंड- कंबरेची चरबी जास्त दिसून येते. (How To Reduce Arm Fat Quickly) अशावेळी फूल स्लिव्हजचे कपडे घट्ट होतात तर हाफ स्लिव्हजचे ड्रेस घालताना १० वेळा विचार करावा लागतो. आर्म फॅट हे कोणत्याही ड्रेसमधून किंवा ब्लाऊजमधून सहज दिसून येते. अनहेल्दी खाणंपिणं- चुकीचं डाएट यामुळे  शरीराची चरबी वाढत जाते.  (Best Ways to Lose Arm Fat)

तेलकट पदार्थ

भारतात तेलकट अन्नपदार्थ सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जातात. काहीजण नाश्त्याला तर काहीजण रात्रीच्या जेवणात तेलयुक्त पदार्थांचा समावेश करतात. जे तब्येतीसाठी अजिबात चांगले नाही. तेलकट अन्नपदार्थ पचवणं खूप कठीण असतं. यामुळे लठ्ठपणा वाढतो. परिणामी आर्म फॅट वाढत जाते. डिप फ्राईड फूड खाल्ल्याने हाय बीपी, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल्स डिसीजचा धोका वाढतो. 

मैदा

समोसा,  पास्ता, बिस्कीट्स असे मैदायुक्त पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. आर्म फॅट वाढवण्यासाठी हे पदार्थही जबाबदार असतात. सकाळ संध्याकाळ मैद्याचे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर आहारात बदल करून बाजरी, मक्का, नाचणी, मल्टीग्रेनपासून तयार झालेले बिस्किट्स, स्नॅक्स खा. यामुळे फॅट्स कमी होऊ लागतात.

गोड पदार्थ

गोड खायला सर्वांनाच आवडतं. सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत अनेक गोड पदार्थ खाण्यात येत असतात. पण या सवयीमुळे आरोग्याचं आणि शरीरयष्टीचं दोन्हींच खूप नुकसान होतं. रात्रीच्यावेळी गोड खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका वाढतो. साखर लठ्ठपणा वाढवण्यासाठीही जबाबदार आहे. कारण साखरेचे फॅट्समध्ये रूपांतर होते.

यामुळे शरीराच्या अनेक भागांची चरबी लटकते.  जर तुम्हाल गोड खायला आवडत असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या गोड असलेले पदार्थ खाऊ शकता. यामुळे शरीराचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. गूळ, खजूर, फळं, मध या पदार्थांचा आहारात समावेश करा. 


आर्म्स फॅट कमी करण्याचे व्यायाम

1) आर्म फॅट कमी करण्यासाठी वॉल पुशअप्स हा उत्तम व्यायाम आहे.  वॉल पुशअप्स केल्यानं अनावश्यक फॅट्स कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला पुर्ण पुशअप्स मारता येत नसतील तर भिंतीला दोन्ही हात लावून वरच्या बाजूनं पुढे जा आणि परत मागे या.

२) शोल्डर टॅप हा उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. शोल्डर टॅप या व्यायामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतील आणि आर्म्सच्या स्नायूंना योग्य आकार येतो.

३) पॅरेलल डिप्स  किंवा चेअर डिप्स केल्यानं तुमच्या ट्रायसेप्सवर दबाव येईल. रोज २०-२० चे ३ सेट्स करा. यामुळे तुमच्या स्नायूंच्या आकारात बदल झालेला दिसून येईल.

Web Title: Best Ways to Lose Arm Fat : How To Reduce Arm Fat Quickly exercises to reduce arm fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.