Lokmat Sakhi >Fitness > पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

Best Ways to Loss Belly Fat Faster : सोल्यूबल फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:21 PM2023-09-28T12:21:17+5:302023-09-28T13:08:46+5:30

Best Ways to Loss Belly Fat Faster : सोल्यूबल फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास मदत होते.

Best Ways to Loss Belly Fat Faster : How to Lose Belly Fat the Right Way | पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

 तासनतास एकाच जागी  बसल्यामुळे पोटाची चरबी सुटते. फिजिकली एक्टिव्ह न राहिल्यामुळे पोट, कंबरेच्या भागावर फ्रट्स जमा होतात. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.  पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले तर चांगला परिणाम दिसू शकतो.  पोटाची चरबी कमी करण्यासाठी  काही सोपे, इफेक्टीव्ह उपाय पाहूया. (Best Ways to Loss Belly Fat Faster)

१) सोल्यूबल फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास मदत होते. ( How to Lose Belly Fat the Right Way) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार फायबर्स पाणी शोषून घेतात आणि पचनक्रिया चांगली राहते. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. फळं, भाज्या सोल्यूबल फायबर्सचा चांगला स्त्रोत आहेत  तुम्ही याचे सेवन  करू शकता. 

२) पोटाची चरबी कमी न होण्यामागचं कारण स्ट्रेस लेव्हल असू सकतं. जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर पोट बाहेर येऊ शकतं. ताण-तणाव पोटाची चरबी वाढण्याचं मोठं कारण आहे. संशोधनानुसार ताण वाढल्यामुळे कॉर्टिसोल हॉर्मोनचा स्तर वाढतो. ज्यामुळे भूक जास्त लागते आणि पोटाभोवती अतिरिक्त फॅट्स जमा होतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी जास्त जाण घेऊ नका.

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट 

३) एरोबिक व्यायाम आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे की पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम उत्तम ठरतो. हाय इंटेंसिटी व्यायाम केल्याने पोटाच्या चरबीवर परिणाम होतो आणि पोट लवकर कमी होण्यास मदत होते. कार्डिओ व्यायाम जमत नसेल तर रोज काही किलोमीट रनिंग किंवा वॉकिंग तुम्ही करू शकता. 

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

४) पोटाची चरबी कमी करण्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोप चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाची असते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की चांगली झोप घेतल्याने लठ्ठपणा, पोटाची चरबी वाढण्याचा धोका कमी होतो. जे लोक रात्री ७ तास व्यवस्थित झोप घेतात त्यांच्या पोटाची चरबी लवकर कमी होते. 

Web Title: Best Ways to Loss Belly Fat Faster : How to Lose Belly Fat the Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.