Join us  

ओटीपोट, कंबरेची चरबी कमी करायची? न चुकता करा ४ गोष्टी, सुटलेले पोटाचे टायर्स होतील सपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 1:59 PM

Best Weight Loss Formula Diet and exercise : तुम्ही काहीही केलं तरी त्यात सातत्य असणं फार महत्वाचे असते. कारण व्यायाम किंवा डाएट थोड्या दिवसांसाठी केला नंतर सोडून दिले तर शरीर अधिकच फुलण्याची शक्यता असते.  

शरीर मेटेंन, माझं फक्त पोटच पुढे आलंय अशी तक्रार महिलांपासून,  पुरूषांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांची असते. चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचं मोठं कारण आहेत. (Weight Loss Tips) आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. काहीजण स्ट्रिक्स्ट डाएट प्लॅन फॉलो करतात तर काहीजण कठीणात कठीण व्यायाम करतात. (Best Weight Loss Formula Diet and exercise )

तुम्ही काहीही केलं तरी त्यात सातत्य असणं फार महत्वाचे असते. कारण व्यायाम किंवा डाएट थोड्या दिवसांसाठी केला नंतर सोडून दिले तर शरीर अधिकच फुलण्याची शक्यता असते.  रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अशा कोणत्या गोष्टी फॉलो केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते समजून घेऊ. (How to lose weight fast)

खाण्यापिण्याच्या सवयी

बॅलेंस डाएटचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची सुरूवात करू शकता. याचा अर्थ असा की वेगवेगळी पोषण मुल्य असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.  जास्त स्ट्रिक्ट डाएट करू नये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अधिक लक्ष द्यायला हवं. 

पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा

पोर्शन कंट्रोल

वजन कमी करण्यासाठी पोर्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही सध्या जितके खाता त्यापेक्षा कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करा आणि फिजिकल एक्टिव्हीटीज वाढवा यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतील आणि शरीर मेटेंन राहील.

आहारात विविधता

फळं, भाज्या, लीन प्रोटीन आणि  मिलेट्स यांसारख्या पोषक तत्वांचा आहारात समावेश करा. यामुळे एक्स्ट्रा कॅलरजी बर्न होण्यास मदत होईल.  कॅलरीजशिवाय शरीराला पोषक तत्व प्रदान होतील.

कोण सांगतं रात्री भात खाल्ल्याने पोट सुटतं? या पद्धतीने पोटभर भात खा, नेहमी स्लिम-मेंटेन राहाल

रोज व्यायाम करा

वजन कमी करण्यात सातत्य गरजेचं असतं. दर दिवशी कमीत कमी  ३० मिनिटं व्यायाम करा. याात चालणे, जॉगिंग, डान्स यांसारख्या एक्टिव्हिजचा समावेश आहे. 

वेट ट्रेनिंग

लीन मसल्ससाठी वेट ट्रेनिंगचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करा.  हा व्यायाम कॅलरीज बर्न करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. सायकलिंग, जपिंग जॅक हे उत्तम व्यायामप्रकार आहेत. अशा एक्टिव्हीज केल्याने शरीर आणि मन दोन्ही एक्टिव्ह राहतील. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य