Join us  

रात्री लवकर झोप लागत नाही? १ मिनिटाचा सोपा उपाय- अंथरुणावर पडताच चटकन शांत झोपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 3:26 PM

Best Yoga Poses or Yogasana For Sound Sleep: रात्री शांत झोप होत नसेल, अंथरुणावर पडूनही बराच वेळ झोप लागत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा...

ठळक मुद्देबऱ्याच जणींना रात्रीच्या वेळी पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा किंवा वात येण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विपरित करणी हे आसन करणे फायदेशीर ठरते.

रात्री आपली चांगली, शांत झोप झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. अंगात उत्साह टिकून राहतो. पण जर झोप नेहमी अपूर्णच होत असेल, शांत झोप लागत नसेल तर दुसरा दिवस खूप खराब जातो. दिवसभर आळस आल्यासारखं, सुस्त झाल्यासारखं होतं. कामंही सूचत नाहीत. त्यामुळे रात्रीची झोप व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. पण काही जणांना मात्र रात्री शांत झोप येतच नाही. अंथरुणावर पडलं तरी बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होण्यातच त्यांची मध्यरात्र उलटून जाते. त्यानंतर कधीतरी डोळा लागतो पण मध्येच वारंवार जाग येते. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक उपाय करून पाहा. (best yoga poses or yogasana for sound sleep)

 

रात्री शांत झोप येण्यासाठी कोणता व्यायाम करावा?

रात्री शांत झोप येण्यासाठी विपरित करणी हा व्यायाम करणे फायदेशीर ठरते असं अंशुका परवानी सांगतात. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी अगदी भिंतीला टेकून पाठीवर झोपा.

सावळ्या रंगावरून हिणवल्यामुळे निताराने 'ही' गोष्ट कायमची सोडली- लेकीबद्दल ट्विंकल खन्ना सांगते....

यानंतर दोन्ही पाय वर घ्या आणि भिंतीला एका सरळ रेषेत लावा. त्याचवेळी दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये पसरवून ठेवा. यावेळी हिप्सपासून ते तळपायाच्या टाचांपर्यंत पायाचा संपूर्ण भाग भिंतीला टेकलेला असावा. ही आसनस्थिती किमान १ मिनिटासाठी टिकवून ठेवावी. रात्री झोपण्यापुर्वी थोडा वेळ काढून हा व्यायाम करा आणि त्यानंतर लगेच झोपी जा. विपरित करणी आसन करण्याचे अन्य बरेच फायदेही आहेत. ते कोणते ते पाहूया..

 

विपरित करणी आसन करण्याचे फायदे

१. रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या चटकन झोप येईल आणि शांत झोप लागेल.

डोळ्यात पाणी येतं अचानक आणि.. अभिनेत्री विशाखा सुभेदार सांगतात, मेनोपॉज त्रास देतो म्हणून..

२. पायाचे स्नायू ताणले जातात आणि त्यांना आराम मिळतो. बऱ्याच जणींना रात्रीच्या वेळी पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा किंवा वात येण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विपरित करणी हे आसन करणे फायदेशीर ठरते.

३. मेंदूला, हृदयाला चांगला रक्तपुरवठा होतो आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.

४. पचनक्रिया चांगली होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे