लठ्ठ आणि थुलथुलीत हात तुमचं सौंदर्य कमी करू शकतात. यामुळे तुम्ही ना स्लिव्हजलेस कपडे घालू शकत ना फिट राहू शकत. जाड हातांना फिट, सुंदर बनवण्यासाठी तुम्ही फक्त १ महिना काही खास योगासनं करायला हवीत. ही योगासनं केल्यानं ३ ते ४ आठवड्यात चांगला परिणाम दिसून येईल. (Best Yogasana For Arm Fat Loss)
ही योगासनं केल्यानं ओव्हरऑल फिटनेसवर चांगला परिणाम होईल. ३ प्रभावी योगासनं कोणती ते पाहूया. रोज फक्त १० मिनिटं हे व्यायाम केल्यानं दंडांची चरबी आपोआप कमी होईल. (Best Yoga to Reduce Arm Fat Know How to Do It Flabby Hand Will Be Toned)
कॅल्शियमच्या कमतरतेनं हाडंच नाही मेंदूसुद्धा होतोय पोकळ; लक्षणं ओळखा, शरीर निरोगी राहील
अधोमुख शवासन
या योगा प्रकाराला डाऊनवर्ड फेसिंग डॉग पोज असंही म्हणतात. हे आसन फक्त आर्म्सना टोन्ड करत नाही तर खांदे आणि पाठीच्या मांसपेशींनाही मजबूत बनवते. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनी आणि गुडघ्यांवर हात ठेवा. नंतर पायांना सरळ करत हिप्स वर उचला. ज्यामुळे शरीर उलट्या व्ही आकारात येईल. काही सेंकंद असेच थांबा नंतर सामन्य स्थितीत या ५ ते ७ वेळा हा उपाय केल्यानं चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येईल.
केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस
चतुरंग दंडासन
याला प्लँक पोज असंही म्हणतात. चतुरंग दंडासनामुळे तुमच्या खांद्यांच्या मांसपेशी मजबूत होतात आणि फॅट बर्न होते. हा व्यायाम करण्यासाठी पोटावर झोपा, शरीराल पायाचे अंगठे आणि हात वर उचलून बॅलेन्स करा. संपूर्ण शरीर सरळ ठेवून ३० ते ६० सेकंद होल्ड करा नंतर सामान्य स्थितीत या. ३ ते ४ वेळा हा व्यायाम करा.
भुजंगासन
भुजंगासनाला कोबरा पोज असं म्हणतात. हे आसन मांसपेशींना टोन करते. नियमित हे आसनं केल्यानं केल्यानं मांसपेशी खेचल्या जातात. हातांवर फॅट जमा होत नाही. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि हात खांद्यांजवळ ठेवा. दीर्घ श्वास घ्या. डोकं आणि छाती वर उचला या स्थितीत काही सेंकंद होल्ड करा. हळूहळू पुन्हा पूर्व स्थितीत या. हे आसन ८ ते १० वेळा करा.