Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

Looking For Refreshing Options For Sports Drinks, Check Out What Bhagyashree Suggests : अभिनेत्री भाग्यश्री फिटनेसचे रहस्य सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. वर्कआऊट सेशन नंतर काय प्यावे असा सल्ला ती देते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 12:33 PM2023-05-27T12:33:37+5:302023-05-27T12:34:10+5:30

Looking For Refreshing Options For Sports Drinks, Check Out What Bhagyashree Suggests : अभिनेत्री भाग्यश्री फिटनेसचे रहस्य सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. वर्कआऊट सेशन नंतर काय प्यावे असा सल्ला ती देते...

Bhagyashree drinks this ‘healthy drink’ after working out, herself revealed the secret of her beauty and fitness | व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

आपल्यापैकी काहीजण दररोज अगदी न चुकता फिट रहाण्यासाठी वर्कआऊट करताना दिसतात. खूप मेहेनत घेऊन आपण रोज वर्कआऊट करत असतो. शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला वर्कआऊट सोबतच हेल्दी खाण्याची देखील तितकीच गरज असते.  काहीवेळा आपण खूप कठोर परिश्रम घेऊन वर्कआऊट करतो परंतु वर्कआऊट नंतर काही हेल्दी खात नाही किंवा चुकीचे काहीतरी खातो. यामुळे आपल्या शरीरावर याचे योग्य ते परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे वर्कआऊट नंतर नेमकं काय खायचं - प्यायचं याचा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने व्हायच्या ५४ व्या वर्षी देखील आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अभिनेत्री भाग्यश्रीला पाहून प्रत्येकाच्या मनात विचार येतो की वयाच्या ५४ व्या वर्षीही ती इतकी सुंदर आणि फिट कशी आहे. तर, बहुतेक लोक या वयापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, सांधेदुखी सुरू होते आणि विविध आरोग्य समस्या त्यांना सतावू लागतात. खरंतर भाग्यश्री तिच्या फिटनेस आणि खाण्यापिण्याची खूप काळजी घेते. ती तिच्या फिटनेसचे रहस्य सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने वर्कआऊट सेशननंतर काय प्यावे हे सांगितले आहे(Bhagyashree drinks this ‘healthy drink’ after working out, herself revealed the secret of her beauty and fitness).

वर्कआऊट केल्यानंतर सर्वात आधी काय प्यावे ? 

भाग्यश्री हिने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, वर्कआऊट झाल्यानंतर ती शहाळाचे पाणी पिण्याचा सल्ला देते. भाग्यश्री सांगते की, नारळ पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. यामुळेच वर्कआऊटनंतर आपण स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून नारळ पाणी पिऊ शकता.

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

वर्कआऊट नंतर शहाळाचे पाणी का प्यावे ? 

शहाळाच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्याला अ‍ॅक्टिव्ह आणि शरीराला ताजेतवाने ठेवतात तसेच अनेक आजारांपासून आपले रक्षण करतात. वर्कआऊटनंतर शहाळाचे पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त होते. याशिवाय, यातून आवश्यक पोषक तत्त्वेही मिळतात. नारळाच्या पाण्यात ९५ % पाणी असल्याने ते पिणे शरीराच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे. हे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. किडनी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर ठरते.

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर... 

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

भाग्यश्रीने शहाळाचे पाणी पिण्याचे ७ फायदे सांगितले आहेत... 

१. वर्कआऊट केल्यानंतर नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. आपल्याला थकवा आणि सुस्त वाटत नाही.  

२. नारळ पाण्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 

३. नारळपाणी प्यायल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.   

४. नारळपाणी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील स्थिर ठेवते.

५. नारळपाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा त्रास होत नाही.

६. नारळपाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

७. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

Web Title: Bhagyashree drinks this ‘healthy drink’ after working out, herself revealed the secret of her beauty and fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.