बॉलीवूडची सुमन अर्थात भाग्यश्री (Bhagyashree) आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती आपल्या फिटनेस रिलेटेड व्हिडिओ सोशल मिडीयात शेअर करत असते. भाग्यश्रीने पन्नाशी ओलांडली जरी असली तरी, ती तरुणाईला लाजवेल अशी फिट अँड फाईन दिसते. मुख्य म्हणजे 'मैने प्यार किया' या पहिल्या चित्रपटात सलमानच्या ऑपोझिट जशी तरूण, सुंदर दिसत होती, तशीच ती अजूनही दिसते. यामागे ती श्रेय फिटनेसलाच देते.
भाग्यश्री व्यायामासह डाएटकडेही विशेष लक्ष देते. तिच्या आहारात काय असतं? ती डाएटमध्ये काय खाते? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. भाग्यश्री अनेकदा आपले डाएट इन्स्टाग्रामवर शेअर करते. तिने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लंचमध्ये खात असलेल्या ग्रीन फूड प्लेटचा फोटो शेअर केला आहे. फिट राहण्यासाठी भाग्यश्री लंचमध्ये काय खाते पाहा(Bhagyashree's Lunch Plate Was Brimming With Green Goodness).
लंचमध्ये भाग्यश्री काय खाते?
भोपळ्याची भाजी
भाग्यश्री आपल्या आहारात भोपळ्याच्या भाजीचा समावेश आवर्जून करते. त्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे आढळतात. हे पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारात भोपळ्याच्या भाजीचा समावेश केल्याने, पचन तर सुधारतेच, शिवाय वजनही नियंत्रित राहते. आपण भोपळ्याची भाजी चपाती, भाकरी किंवा भातासह खाऊ शकता.
दुधी भोपळ्याच्या सालीची भाजी
दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण अनेकदा त्याची साल खाल्ली जात नाही. पण दुधी भोपळ्याच्या सालींमध्येही पौष्टीक घटक असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आपण दुधी भोपळ्याची साल न टाकता त्याची चविष्ट भाजी तयार करून खाऊ शकता.
दोडका
दोडका ही एक फळभाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ज्याचा फायदा आपल्या आरोग्याला होतो. आपल्याला जर दोडक्याची भाजी आवडत नसेल तर, त्यात आपण बटाटा, कांदा आणि टोमॅटो घालून खाऊ शकता.
ढेमश्याची भाजी
नावडत्या भाजीच्या यादीत ढेमश्याच्या भाजीचं नाव जरी असलं तरी, ही भाजी पौष्टीक घटकांनी परिपूर्ण आहे. ढेमश्यामध्ये फायबर, जीवनसत्वं, खनिजे, यासह लोह आणि पोटॅशियम आढळते. ढेमश्याची भाजी पचनास सोपी असते. ज्यामुळे पोटाचे इतर विकार होत नाही. शिवाय वजनही कमी करण्यास मदत होते. आपण आपल्या आहारात ढेमश्याच्या भाजीचा नक्कीच समावेश करू शकता.