Lokmat Sakhi >Fitness > वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

Amitabh Bachchan's Diet And Fitness Routine: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस एक्सपर्टने सांगितलं आहे अमिताभ बच्चन यांचे डाएट आणि फिटनेस रुटीन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2025 14:02 IST2025-01-20T14:01:08+5:302025-01-20T14:02:53+5:30

Amitabh Bachchan's Diet And Fitness Routine: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस एक्सपर्टने सांगितलं आहे अमिताभ बच्चन यांचे डाएट आणि फिटनेस रुटीन..

big b Amitabh Bachchan's diet and fitness routine at the age of 82 | वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

Highlightsआजही पहाटे ५ वाजता त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम चाललेले असते. हे सगळं त्यांना कसं जमतं?

बिग बी अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वयाच्या अर्धे वय असणारे कित्येक लोक स्वत:ला वयस्कर समजायला लागले असतात. पण अमिताभ मात्र ८२ वर्षांचे असले तरीही त्यांचा उत्साह आणि कामाच उरक मात्र जराही कमी झालेला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणत्याही प्रकारच्या पोक्तपणाचा जराही लवलेश कधीही दिसत नाही. आजही पहाटे ५ वाजता त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम चाललेले असते. हे सगळं त्यांना कसं जमतं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी एवढा उत्साह त्यांच्यात कुठून येतो, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर त्यांच्या फिटनेस ट्रेनरने सांगितलेल्या या काही खास गोष्टी एकदा वाचाच...(Big B Amitabh Bachchan's diet and fitness routine at the age of 82)

 

काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस ट्रेनर वृंदा मेहता यांची एक मुलाखत ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांच्यावतीने घेण्यात आली होती. या मुलाखतीत वृंदा यांनी सांगितलं की अमिताभ यांना हे पक्कं ठाऊक आहे की फिट राहण्यासाठी व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे.

तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स

त्यामुळे ते दररोज नियमितपणे अगदी न चुकता व्यायामासाठी वेळ काढतात. त्या असंही म्हणतात की जर बिग बींसारख्या व्यक्तीला व्यायामासाठी वेळ मिळू शकतो, तर आपल्याला का नाही.. त्यांनी विचारलेला प्रश्न खरंतर अगदी योग्य आहे. थोडा आळस बाजूला सारला आणि रोजच्या कामातून थोडा वेळ दिला तर आपणही नक्कीच व्यायाम करू शकतो.. श्वसनाच्या व्यायामाने त्यांच्या वर्कआऊटची सुरुवात होते. त्यानंतर मग प्राणायाम आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग ते करतात.

 

व्यायायासोबतच त्यांच्या आहाराबाबतही बिग बी अतिशय काटेकोर आहेत. शिवोहम हे त्यांचे आणखी एक फिटनेस ट्रेनर. ते सांगतात की तुळशीची पानं खाऊन अमिताभ यांच्या दिवसाची सुरुवात होते.

जेवण जास्त झाल्याने अस्वस्थ होतंय? बसल्या बसल्या 'हे' काम करा; १५ मिनिटांत बरं वाटेल

त्यानंतर नाश्त्यामध्ये ते प्रोटीन शेक, बदाम, नारळपाणी, गुसबेरी ज्यूस, खजूर यासोबतच काही सुकामेवा आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेतात. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ यांनी स्वत:च असं सांगितलं होतं की मागच्या काही वर्षांपासून त्यांनी गोड पदार्थ, भात, मांसाहार घेणं बंद केलं आहे.. बघा आत यापैकी काय काय तुम्हाला करणं शक्य आहे.. 

 

Web Title: big b Amitabh Bachchan's diet and fitness routine at the age of 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.