Lokmat Sakhi >Fitness > पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

Weight Loss Tips: Body Fat problem: coriander drink for fat loss: coriander drink for weight loss: dhanyach pani benefits: coriander seeds drink for weight loss: benefits of coriander seeds water empty stomach: benefits of drinking coriander seeds water for weight loss: can we drink coriander seed water at night: धण्याचं पाणी प्यायल्यानं खरोखर वजन कमी होतं का? आरोग्यासाठी हे पाणी बहुगुणी ठरतं का? जाणून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 11:10 IST2025-02-17T11:09:45+5:302025-02-17T11:10:22+5:30

Weight Loss Tips: Body Fat problem: coriander drink for fat loss: coriander drink for weight loss: dhanyach pani benefits: coriander seeds drink for weight loss: benefits of coriander seeds water empty stomach: benefits of drinking coriander seeds water for weight loss: can we drink coriander seed water at night: धण्याचं पाणी प्यायल्यानं खरोखर वजन कमी होतं का? आरोग्यासाठी हे पाणी बहुगुणी ठरतं का? जाणून घेऊया...

body fat stomach and thighs issue reduce benefits of drinking coriander seeds water for weight loss | पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये लठ्ठपणा वाढताना दिसत आहे. यामध्ये तरुणपिढीचा देखील समावेश आहे. (Weight Loss Tips) खाण्यापिण्याच्या सवयी, सततचे जंक फूड, अपुरी झोप आणि अधिक प्रमाणात वाढलेला ताण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. आपल्या प्रत्येकाला सध्या फिट आणि स्लीम दिसावं असं वाटतं परंतु, पोटावरची आणि मांड्यांवरची चरबी वाढलेली पाहून नेमकं काय करावं सुचत नाही. (coriander drink for fat loss)

डाएट प्लान, व्यायाम करुन देखील बरेचदा आपले वजन कमी होतं नाही. (benefits of drinking coriander seeds water for weight loss) पोटावर वाढलेली चरबी बघून केवळ आजारच नाही तर आपलं मानसिक आरोग्य देखील बिघडतं. वजन कमी करण्यासाठी आपणं जितकं शारीरिक कष्ट घेतो तसेच काही नैसर्गिक गोष्टींचा देखील अवलंब करतो. वजन कमी करण्यासाठी आपण धण्याचं पाणी पितो. पण धण्याचं पाणी प्यायल्यानं खरोखर वजन कमी होतं का? आरोग्यासाठी हे पाणी बहुगुणी ठरतं का? जाणून घेऊया...

1. धण्याच्या पाण्याचे फायदे 


धण्याच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. या पाण्याचे सेवन केल्याने पचन सुधारते तसेच चयापचय देखील वाढतो. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. काही अभ्यासातून असे समजले आहे की, धण्याचे पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं. पण फक्त धण्याचं पाणी पिऊन वजन कमी होत नाही तर पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार पद्धत अवलंबल्यामुळे वजन कमी होते. 

2. बॉडी फॅट कमी करण्यासाठी आहार 

बॉडी फॅट कमी करण्यासाठी निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ खाऊ नका. 
फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते. 
कडधान्यांमध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. जे तुम्हाला ऊर्जा देतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. 
प्रथिने स्नायू तयार करण्यास आणि ते मजबूत करण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. 
ओमेगा - ३ फॅटी अॅसिड्स वजन कमी करण्यास मदत करु शकतात. यामुळे चयापचय सुधारते आणि पोट भरल्यासारखे वाटते. 

 

3. वजन कमी करण्यासाठी टिप्स 


वजन कमी करण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीर सक्रिय राहाण्यास मदत होते.
पुरेशी झोप न घेतल्याने आपले वजन झपाट्याने वा़ढू लागते. त्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. 
ताणामुळे वजन वाढू शकते. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा विश्रांती घ्या. 
भरपूर प्रमाणात पाणी प्या. ज्यामुळे तुमचा चयापचय वाढेल. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या. 
 

Web Title: body fat stomach and thighs issue reduce benefits of drinking coriander seeds water for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.