Join us  

व्यायामाला वेळच नाही, फक्त ५ मिनीटं करा बॉडी टॅपिंग, आरोग्याच्या कित्येक समस्या होतील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 4:20 PM

Body Tapping or Face Tapping Technique for good Health : डोक्यापासून ते अगदी पोटापर्यंत विविध ठिकाणी आपण हे टॅपिंग केल्यास आरोग्याला त्याचे अतिशय चांगले फायदे होतात.

चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी किंवा ग्लो वाढवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारचे मसाज घेतो. इतकेच काय काही इलेक्ट्रॉनिक ट्रिटमेंटसही घेतो. याशिवाय स्लॅप थेरपी, अॅक्युप्रेशर, टॅपिंग अशा विविध थेरपींचाही आपण रिलॅक्सेशनसाठी उपयोग करतो. पण शरीर आणि मन दोन्हीही शांत व्हायचे असेल आणि त्याला आराम मिळावा असे वाटत असेल तर व्यायाम करायलाच हवा. मात्र खूप प्रयत्न करुनही व्यायामाला वेळच मिळत नसेल तर बॉडी टॅपिंग या टेक्निकचा आपण निश्चितच विचार करु शकतो. डोक्यापासून ते अगदी पोटापर्यंत विविध ठिकाणी आपण हे टॅपिंग केल्यास आरोग्याला त्याचे अतिशय चांगले फायदे होतात. केवळ चेहराच नाही तर शरीराच्या इतर ठिकाणीही हे टॅपिंग केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. प्रसिद्ध योग अभ्यासक स्मृती यांनी या टॅपिंगचे काही महत्त्वाचे फायदे आपल्याला सांगितले असून ते कोणते आणि हे टॅपिंग नेमके कसे करायचे पाहूया (Body Tapping or Face Tapping Technique for good Health)....

काय आहे हे फेस टॅपिंग?

फेस टॅपिंग म्हणजे चेहऱ्यावर बोटं नाचवत चेहऱ्याचा मसाज करणं. एरवीच्या मसाजपेक्षा हा मसाज वेगळा आहे. बोटं चेहऱ्यावर गोल फिरवत नाही तर चेहऱ्यावर बोटं नाचवत फेस टॅपिंग केलं जातं. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. त्वचेखाली कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. चेहऱ्यावरची सूज कमी होते. फेस टॅपिंमुळे त्वचेखाली विषारी घटक साचत नाही आणि त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठाही व्यवस्थित होतो. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर आलेला तणाव दूर होतो आणि छान रिलॅक्सही वाटतं. 

(Image : Google )

टॅपिंग केल्यास अर्थात बोटं नाचवत मसाज केल्यास त्या त्या भागांना ऊर्जा आणि चेतना मिळते. टॅपिंगमुळे हे अवयव सक्रीय होतात. टॅपिंगमुळे चेहऱ्यावरील स्नायुंना आराम मिळण्यास मदत होते. कपाळाला फेस टॅपिंग केल्यानं रक्तप्रवाह सुधारतो आणि ताण कमी होतो. कपाळाकडील रक्तप्रवाह सुधारल्याने सुरकुत्या कमी होतात, हलकेपणा जाणवतो. सौंदर्यतज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावरचे तारुण्य टिकवण्याचा यापेक्षा सोपा आणि किफायतशीर असा दुसरा उपाय नाही. हे टॅपिंग भ्रामरी प्राणायाम करत केल्यास त्याचा आणखी चांगला इफेक्ट दिसून येण्यास मदत होते. 

फायदे...

१. १. टॅप केल्याने कोर्टीसोल या घटकाची पातळी आणि कमी होण्यास आणि ताण व चिंता कमी होण्यास मदत होते. 

२. टॅपिंगमुळे मूड सुधारतो, स्वाभिमान वाढतो आणि राग, भीती आणि अपराधी भावना यासारख्या नकारात्मक भावना कमी होतात.

३. डोकेदुखी, विविध प्रकारच्या पोस्ट ऑपरेटीव्ह शारीरिक वेदना कमी करण्यासाठी  टॅपिंगचा चांगला उपयोग होतो. 

४. बऱ्याच जणांना सिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असते. हे व्यसन कमी करण्यासाठी टॅपिंगचा अतिशय चांगला फायदा होतो. व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी टॅपिंग थेरपी आवर्जून वापरली जाते. 

५. क्रिडा, पब्लिक स्पीच आणि विविध प्रकारच्या टेस्ट घेण्यासाठी टॅपिंग टेक्निक आवर्जून वापरले जाते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआरोग्य