Join us  

हातपाय बारीक पोट सुटलं? वाढलेली ढेरी होईल कमी, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 3 सोपी आसनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 12:51 PM

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा, तुम्हीही दिसाल स्लीम-फिट

ठळक मुद्देपोट बारीक व्हायला हवंच पण त्याची ताकदही वाढायला हवीरोज न चिकता १० मिनीटांत हे व्यायाम केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल

व्यायाम हा उत्तम तब्येतीसाठी जितका आवश्यक आहे तितकाच तो चांगले दिसण्यासाठीही आवश्यक असतो. लठ्ठपणा वाढला की आपल्याला आपलीच लाज वाटते आणि आपला आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. यातही पोट, कंबर, दंड, छातीचा भाग याठिकाणी चरबी साठण्याचे प्रमाण जास्त असते. पोट वाढणे ही तर अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. दिवसभर बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे आपलं पोट वाढतं. नुसतं वाढत नाही तर ते लटकायला लागतं. अशावेळी आपण कसेही कपडे घातले तरी ते लपत नाही. वाढलेले पोट कमी करायचे म्हणजे व्यायाम आणि आहारातील बदल याला पर्याय नाही हेच खरं. 

(Image : Google)

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हेच वाढलेलं पोट कमी करण्यासाठी काही खास व्यायामप्रकार सांगत आहे. भाग्यश्री आपल्या फिटनेसबाबत कायमच सजग असते. आपल्या चाहत्यांनाही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही सूचना देऊन फिटनेसबाबत जागरुक करत असते. नुकतीच भाग्यश्रीने आपल्या इन्स्टग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने वाढलेलं पोट कमी करण्यासाठी ३ सोपे व्यायामप्रकार सांगितले आहेत. हे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास पोट कमी करण्यासाठी त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो. पोट फ्लॅट होण्याबरोबरच ते टाइट कोअर असणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं असंही भाग्यश्री आपल्या पोस्टला कॅप्शन देताना म्हणते. आता फिट राहण्यासाठी ती कोणती आसने सांगेत बघूयात 

१. अधोमुख श्वानासन

यालाच डाऊनवर्ड फेसिंग पोज असेही म्हटले जाते. या आसनात एक हात मागे नेऊन आपल्या पायाच्या बोटांना लावायचा. हे करत असताना कंबरेची कमीत कमी हालचाल व्हायला हवी. यामुळे पोटाच्या स्नायूंवर भार येऊन नकळत पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. जितक्या वेगाने हा व्यायामप्रकार कराल तितका तुम्हाला याचा जास्त चांगला फायदा होईल. 

२. प्लॅंक 

शरीराची एकूण ताकद वाढवण्यासाठी प्लँक करणे अतिशय उपयुक्त ठरते. यातही हातात वजन घेतल्यास पाठीची ताकद आणि स्थिरता वाढण्यास मदत होते. कंबर आणि पोटाच्या भागातील स्नायूंना यामुळे चांगला व्यायाम होतो आणि पोटावरची आणि कंबरेवरची चरबी कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

३. सिट अप्स 

सिट अप्स मारणे दिसायला सोपे असले तरी ते करायला तितके सोपे नसते. कारण पाठीवर झोपून पोटातून वर उठणे यासाठी शरीराला बराच ताण पडतो. पण त्यामुळे पोटाचे स्नायू बळकट तर होतातच पण याठिकाणी साचलेली चरबी कमी होण्यासही त्याची चांगली मदत होते. आपल्याला ताकद जास्त वाढवायची असेल तर हातात वजन किंवा एखादी वस्तू घेऊन हा प्रयोग करावा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सभाग्यश्री