काही व्यक्ती पक्क्या फिटनेस फॉलोअर असतात. अशा व्यक्तींना दररोज व्यायामाचे तेच ते रूटीन फॉलो करतानाही अजिबातच कंटाळा येत नाही. उलट त्याचं वर्कआऊटचं सेशन (workout session) ते कमालीचं एन्जॉय करतात. पण काही जणं असेही असतात की तोच तो व्यायाम (exercise) करुन त्यांना कंटाळा येऊन जातो. प्रत्येक आठवड्यात किंवा महिन्यात त्यांना त्यांच्या फिटनेस रुटीनमध्ये काही तरी बदल पाहिजे असतो. अशा व्यक्तींना आणि स्पेशली ज्यांना डान्स आणि फास्ट बीटचं म्युझिक आवडतं अशा व्यक्तींना अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने एक मस्त वर्कआऊट सांगितलं आहे..
आपल्याला माहितीच आहे की शिल्पा शेट्टी इन्स्टाग्रामवर (instagram) खूप जास्त ॲक्टीव्ह असते. ती प्रत्येक आठवड्यात तिच्या चाहत्यांसाठी एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते, त्याची तर अनेक जणं आतुरतेने वाट पाहत असतात. आता या आठवड्यासाठीदेखील शिल्पाने एक फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे. New routines for the New Year.... असं सांगत शिल्पाने नव्या वर्षासाठी एक मस्त फिटनेस प्लॅन दिला आहे. ती म्हणते की Fun आणि Toning अशा दोन्ही गोष्टी एकाच व्यायाम प्रकारात पाहिजे असतील, तर नव्या वर्षात मस्त एरोबिक्स करा.. एरोबिक्स (aerobics for calories burn) करतानाचा शिल्पाचा हा व्हिडियो (aerobics viseo of actress Shilpa Shetty) सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral on social media) झाला आहे.
या व्हिडियोमध्ये शिल्पा तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली ४५ मिनिटांचे एरोबिक्स वर्कआऊट सेशन करताना दिसते आहे. काही डान्सर आणि फिटनेस ट्रेनर यांच्या मते डान्स हा वर्कआऊटचाच एक प्रकार आहे. डान्स केल्यामुळे होणाऱ्या बॉडी मुव्हमेंट्स तुमची बॉडी टोन्ड करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच तर बसण्याच्या, उठण्याच्या, उभे राहण्याच्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखादी स्त्री किंवा पुरुष हे डान्सर आहेत हे ओळखता येतं. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी डान्स खूप जास्त उपयुक्त ठरतो.
एरोबिक्स डान्स प्रकार हे याचेच मॉडर्न आणि अतिशय अभ्यासपूर्ण रूप. एरोबिक्स वर्कआऊटमध्ये तुमच्या बाॅडी मुव्हमेंट्स अशा काही डिझाईन केल्या जातात, की त्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर तर सुधारतेच पण बाॅडी टोन्ड होऊन वेटलॉस, कॅलरीज बर्न होण्यासाठीही उपयोग होतो. म्हणूनच एरोबिक्स वर्कआऊट फिटनेस वर्ल्डमध्ये कमालीचे लोकप्रिय ठरलेले आहे. हेच सांगते आहे शिल्पा शेट्टी. तिने तिचा एरोबिक्स वर्कआऊट व्हिडियो शेअर करत एरोबिक्स करण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत.
एरोबिक्स वर्कआऊट करण्याचे फायदे
Benefits of aerobics workout
- एरोबिक्समुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. त्यामुळे त्याला full body workout म्हणून ओळखले जाते.
- कार्डियो रेस्पिरेटरी हेल्थ (cardio respiratory health) सुधारण्यासाठी हे वर्कआऊट अधिक फायदेशीर मानले जाते.
- शरीरावरील अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी (fat burn) एरोबिक्स नियमितपणे करावे.
- हात आणि पाय टोन्ड (body toning) होण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.
- एस्ट्रा कॅलरी बर्नसाठी (calories burn) एरोबिक्स चांगले मानले जाते.
- शरीर आणि मनाचे संतूलन साधून एकाग्रता वाढविण्यासाठी, मन आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी एरोबिक्स करणे फायद्याचे ठरते.
- एरोबिक्स केल्याने मेंदू तल्लख होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एरोबिक्स करणे चांगले आहे.
- आनंद, मजा घेत घेत व्यायाम करायचा असेल, तर एरोबिक्स हा त्यासाठीचा सगळ्यात चांगला पर्याय आहे, असे अनेक फिटनेस ट्रेनर सांगतात.