Lokmat Sakhi >Fitness > यामी गौतम सांगतेय पद्मासनाचे फायदे, यामुळे मिळते मन:शांती आणि बरेच काही..

यामी गौतम सांगतेय पद्मासनाचे फायदे, यामुळे मिळते मन:शांती आणि बरेच काही..

नुकतंच लग्न झालेली बॉलीवूडची अभिनेत्री यामी गौतम तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस मोटिव्हेशन देत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून यामध्ये तिने पद्मासन घातले आहे आणि त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:15 PM2021-07-16T16:15:36+5:302021-07-16T16:24:38+5:30

नुकतंच लग्न झालेली बॉलीवूडची अभिनेत्री यामी गौतम तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस मोटिव्हेशन देत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून यामध्ये तिने पद्मासन घातले आहे आणि त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. 

Bollywood actress Yami Gautam shares the benefits of padmasana, lotus pose of yoga | यामी गौतम सांगतेय पद्मासनाचे फायदे, यामुळे मिळते मन:शांती आणि बरेच काही..

यामी गौतम सांगतेय पद्मासनाचे फायदे, यामुळे मिळते मन:शांती आणि बरेच काही..

Highlightsदररोज पद्मासन घातल्याने शरीरातील मेद कमी होतो आणि उत्साह वाढतो.पद्मासनामुळे मन:शांती मिळते.

यामी गौतमची नितळ त्वचा आणि तिचे सात्विक सौंदर्य हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तिच्या या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम तिचे मोहक हास्य करते. नुकतीच लग्न झालेली यामी सध्या न्युयॉर्कला असून तिने तिथून फिटनेस प्रेमींसाठी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये यामी अतिशय आकर्षक दिसत असून जणू योगामुळेच तिचा चेहरा अधिक तजेलदार झाल्यासारखा दिसत आहे. यामध्ये यामीने पद्मासन घातले असून ती डोळे मिटून आणि हात जोडून ध्यानस्थ बसली आहे. ''At peace'' अशी कमेंटही तिने या फोटोसोबत शेअर केली आहे. 

 

पद्मासनाचे फायदे
१. पद्मासनामुळे मन:शांती मिळते.
२. पद्मासनात असताना पाठीचा कणा ताठ राहतो आणि बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते.
३. खूप वेळ बसल्यानंतर पाय आखडून जातात. अशा वेळेस पद्मासन घातल्याने हिप्सपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत सगळ्या शिरा मोकळ्या होतात.
४. निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या लोकांना पद्मासन केल्यामुळे खूप लाभ मिळताे.


५. पद्मासनामुळे अंत:स्त्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात.
६. दररोज पद्मासन घातल्याने शरीरातील मेद कमी होतो आणि उत्साह वाढतो.
७. ज्यांचे पाय कायम दुखत असतात, अशा लोकांनीही दररोज काही मिनिटांसाठी पद्मासन घालावे. निश्चितच फायदा होतो. 
८. दमा, अस्थमा हे आजारही नियमित पद्मासन घातल्याने नियंत्रणात राहतात. 

 

पद्मासन कसे घालावे ?
- सगळ्यात आधी जमिनीवर पाय पसरवून ताठ  बसावे. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत व डावा पाय उजव्या पायाच्या जांघेत ठेवावा. डावा पाय आधी घेऊन नंतर उजवा पाय घेतला, तरी चालते. 
- दोन्ही हातांच्या अंगठ्याला त्या- त्या हाताच्या तर्जनीने स्पर्श करावा व असे तळहात दोन्ही गुडघ्यांवर ठेवावे. पाठचा कणा ताठ ठेवावा. 
- पद्मासनाच्या दुसऱ्या प्रकारात दोन्ही हात पाठीमागे न्यावेत. आणि पाठीमागून उजव्या हाताने उजव्या पायाचा तर डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. अशा अवस्थेत डोळे मिटून ध्यानस्थ बसावे. 

 

Web Title: Bollywood actress Yami Gautam shares the benefits of padmasana, lotus pose of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.