Lokmat Sakhi >Fitness > अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

Breakfast Menu of famous Bollywood actresses फिट राहण्यासाठी अभिनेत्री सकाळच्या न्याहारीमध्ये काय खातात पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2023 01:10 PM2023-03-05T13:10:33+5:302023-03-05T13:12:09+5:30

Breakfast Menu of famous Bollywood actresses फिट राहण्यासाठी अभिनेत्री सकाळच्या न्याहारीमध्ये काय खातात पाहा..

Breakfast Menu of famous Bollywood actresses | अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

बॉलिवूड अभिनेत्री फिट राहण्यासाठी काय खातात, कोणेतं डाएट फॉलो करतात? याबाबतीत अनेकांना उत्सुकता असतेच. फिटनेस व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सेलिब्रिटी डाएटला काटेकोरपणे फॉलो करतात. अभिनेत्री त्यांच्या आहारतज्ञांनी दिलेल्या डाएट चार्टनुसार ब्रेकफास्ट, लंच, डिनर करतात.

कोणता पदार्थ किती प्रमाणावर खावा, मोजमाप करून त्या अन्नाचे सेवन करतात. डाएटमध्ये ब्रेकफास्ट महत्वाचा असतो. आपण देखील अभिनेत्री ब्रेकफास्टमध्ये काय खातात हे जाणून घेऊन त्यांच्या डाएटला फॉलो करू शकता, आणि त्यांच्यासारखे फिट राहू शकता(Breakfast Menu of famous Bollywood actresses).

आलिया भट्ट

क्युट गर्ल आलिया भट्टला नुकतीच कन्यारत्न प्राप्त झाली आहे. ती सध्या मातृत्व एन्जॉय करीत आहे. आता ती पुन्हा तिच्या फिटनेस रुटीनकडे परतली आहे. आलिया तिच्या डाएटची खूप काळजी घेते. ती नाश्त्यामध्ये इडली, डोसा सारखे पदार्थ खाण्यास प्राधान्य देते.

कतरिना कैफ

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींच्या यादीत कतरिना कैफचा समावेश आहे. ती आपल्या निखळ सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने कपिल शर्मा शोमध्ये खुलासा केला होता की, तिला हलका नाश्ता करायला आवडतो. ती न्याहारीमध्ये स्मुदी अथवा स्टीम पदार्थाचे सेवन करते.

करीना कपूर

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आपल्या सिजलिंग अदाकारीसाठी ओळखली जाते. तिला २ मुलं असूनही, ती आपल्या फिटनेसची पुरेपूर काळजी घेते. पंजाबी असल्यामुळे तिला विविध पदार्थ खायला आवडते, पण ती डाएट फॉलो करायला विसरत नाही. करीनाला नाश्त्यात पराठ्यासोबत दही खायला आवडते.

भूमी पेडणेकरने कमी केलं ३२ किलो वजन, पण कसं? आईचा सल्ला तिने ऐकला आणि...

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी योग करून खूप तंदुरुस्त राहते. तिला नाश्त्यात प्रोटीन शेक प्यायला आवडते. शिल्पा तिच्या प्रोटीन शेकमध्ये खजूर, मनुका यासारख्या हेल्दी गोष्टींचा समावेश करते. ती फिटनेसकडेही खूप लक्ष देते. तिचा नाश्ता हलका आणि आरोग्यदायी असतो.

Web Title: Breakfast Menu of famous Bollywood actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.