दिवसभरातील सगळ्यात महत्वाचं जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता. हेल्दी लाईफस्टाईलसाठी सकाळी ७ ते ८ दरम्यान नाश्ता करायला हवा. नाश्ता तुमच्या शरीराला दिवसभर एक्टिव्ह राहण्यात मदत करतो. तुम्ही नाश्त्याला काय खाता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. नाश्त्यासाठी अनेक इस्टंट पदार्थ उपलब्ध आहेत. यामुळे तब्येतीला धोका उद्भवू शकतो. नाश्त्याला कोणते पदार्थ टाळायला हवेत ते पाहूया. (Breakfast tips to reduce fat avoid these 5 food if you want to lose abdominal obesity)
कॉफी
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आहारात क्रिम आणि एक्स्ट्रा साखर घातलेली कॉफी घेऊ नका. यामुळे इतर आरोग्य समस्या वाढू शकता. यामुळे वजन वाढून शरीरातील अतिरिक्त चरबीसुद्धा वाढते. जास्त साखर असलेल्या पदार्थांमध्ये कमी पोषक तत्व असतात.
पांढरा ब्रेड
पांढरा ब्रेड यांसारख्या रिफाईन कार्ब्समुळे वेगानं वजन वाढतं. खासकरून पोटाजवळची चरबी खूपच वाढते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकर न्युट्रिशियनच्या एका रिपोर्टनुसार पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मैदायुक्त पदार्थांचे सेवन करू नये.
ब्रेकफास्ट सिरील
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डीओलॉजीच्या एका अभ्यासानुसार अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. इंस्टट पदार्थांचे सेवन करू नये कारण यात साखरेचं प्रमाण जास्त असतं.
फास्ट फूड
फास्ट फूड सहज उपलब्ध होतं. यामुळे लोक याचे सर्रास सेवन करतात. यामुळे आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. फास्ट फूडमध्ये ट्रांस फॅटचे प्रमाण जास्त असते. याचे नियमित स्वरूपात सेवन केल्यानं हृदयरोग, डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
थंडीत गुडघेदुखी वाढलीये? घरी बनवलेलं 'हे' जादूई तेल लावा; गुडघे, कंबरदुखीचा त्रासच टळेल
प्रोसेस्ड मीट
प्रोस्टेड मीट बेली फॅट वाढवण्यासाठी सगळ्यात वाईट नाश्ता आहे. प्रोसेस्ड मीट कॅलरी आणि ट्रांस फॅटयुक्त असते. यामुळे पोटावरची चरबी वाढते. याशिवाय हार्ट डिसिज आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.