रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत एक्टीव्ह राहणं खूपच कठीण झालं आहे. रोज ११ मिनिटं चालल्यानं तुम्ही मृत्यूचा धोका टाळू शकता. डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार चालण्याचे बरेच फायदे आहेत. एका आठवड्यात कमीत कमी १५० मिनिटं मॉडरेट इंटेंसिटीनं एक्टिव्ही ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एक्सपर्ट्सच्यामते असं केल्यानं लवकर मृत्यू येण्याचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो. (Brisk walking of 11 minutes or moderate intensity activity per day can slash chances of dying early)
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनाही दिसून आलं की आठवड्याभरात ७५ मिनिटं फिजिकल एक्टिव्हीटी केल्यानं हृदयाचे आजार, स्ट्रोक आणि कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. संशोधनात अशा ३० मिलियन लोकांची माहिती काढण्यात आली जे आठवड्यातून कमीत कमी ७५ मिनिटं मॉडरेट इंटेंसिटी एक्टिव्हीटी सारख्या सायकलिंग, डान्सिंग यांसारखे व्यायाम करत होते. त्यांच्यात लवकर मृत्यू येण्याचा धोका २३ टक्क्यांनी कमी होता. म्हणजे व्यायाम केल्यानं लोक हृदयाच्या आजारांपासून लांब राहू शकतात.
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या डॉ. सेरेन ब्रेज सांगतात की व्यायाम करून एक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आठवड्याभरात १५० नाही जवळपास ७५ मिनिटं ब्रिस्क वॉकिंग केल्यानंही आजारांपासून दूर राहता येतं. रिपोर्टनुसार पूर्ण आठवड्यात एरोबिक रुटीन फॉलो करण्यावर अधिक लक्ष द्यायला हवं.
या अभ्यासात दिसून आलं की ३ पैकी २ टक्के लोक आठवड्यातभरात १५० मिनिटांपेक्षा कमी फिजिकल एक्टिव्हीटी करत होते. १० पैकी एक व्यक्ती आठवड्यातून ३०० मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करत होती. या संधोशनात असं दिसून आलं की आठवड्यात १५० मिनिटांपेक्षा जास्त फिजिकल एक्टिव्हिटी केल्यानं आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम पातळीवरील शारीरिक हालचाली केल्यास लवकर मृत्यू टाळता येऊ शकतो. म्हणजेच शारीरिक हालचालींचा थेट संबंध आपल्या चांगल्या आरोग्याशी असतो. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यक्तीने आरोग्याला जपण्यासाठी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.