Join us  

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2023 5:18 PM

Simple Morning Habits To Help You Lose Belly Fat : काही केल्या पोटावरची वाढत जाणारी चरबी कमी होत नाही ? रोजच्या रुटीनमध्ये ५ नियमांचे पालन करून आपण झटपट पोटावरील चरबी कमी करू शकतो.

आपल्यापैकी बरेचजण सध्या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त झालेले दिसत आहेत. सध्याच्या काळात वाढते वजन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. वाढत्या वजनासोबतच पोटावरील वाढत जाणारी चरबी हा देखील अतिशय चिंतेचा विषय झाला आहे. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. पोटावरची चरबी सतत वाढत राहिल्याने आपल्याला पुढील काळात गंभीर आजारांच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे पोटावरची चरबी सतत वाढतच जाते. या वाढणाऱ्या चरबीमुळे वेगवेगळे आजार तर होतातच सोबतच  वाढलेल्या पोटामुळे आपल्या लूक आणि एकूणच व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो. 

वाढलेल पोट हे अनेक आजारांचे घर बनून जाते. सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील व्यक्तींचे पोट चरबीमुळे अति फुगलेले दिसते. हे चरबी वाढलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्यापैकी काहीजण अथक प्रयत्न करताना दिसून येतात. पोटावरील वाढलेली चरबी अशी सहजासहजी कमी होणे शक्य नसते. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याची उत्तम सांगड घालावी लागते. आपण रोजच्या रुटीनमध्ये काही सोप्या गोष्टींचा वापर करुन झटपट आपल्या पोटाची चरबी कमी करु शकतो(Burn Belly Fat All Day With This Simple Morning Routine).

पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नेमके काय काय करावे ? 

१. भरपूर पाणी प्यावे :-  सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी आवर्जून प्यावे. सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते.  सकाळी एक ग्लास पाणी शरीराला जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच, सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्याने त्वचेला चमकदारपणा प्राप्त होतो. आपण आपल्या आवडीनुसार, साधे पाणी प्या किंवा त्यात लिंबाचा रस पिळूनही पिऊ शकता. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी लिंबू पाणी हा एक चांगला पर्याय आहे.

व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

२. नाश्त्यामध्ये प्रथिने असणे आवश्यक आहे :- सकाळी कितीही उशीर झाला तरीही प्रोटिन्सचा समावेश असलेला घरचा नाश्ता खाण्याचा प्रयत्न करावा. चुकूनही नाश्ता न करणे टाळू नका कारण त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ज्यामुळे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास भूक कमी लागून चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास मदत होते. यासोबतच प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने आपल्या शरीरातील स्नायू बळकट करण्यास मदत होते. ज्यामुळे शरीर मजबूत होते आणि हार्डकोर वर्कआउटसाठी तयार होते. प्रथिनांसाठी अंडी, दूध, कॉटेज चीज, मसूर, बदाम, टोफू, शेंगदाणे आणि ग्रीक दही यासारख्या गोष्टींचा नाश्त्यामध्ये समावेश करा.

करा रोज फक्त १ आसन, स्किनवर ग्लो - मासिक पाळीचा त्रास होईल कमी...

३. वर्कआउट रूटीन फॉलो करा :- आपल्यापैकी काहीजण हे वर्कआउट रूटीन करण्यास सुरुवात तर करतात परंतु ते कायम फॉलो करत नाहीत. काहीदिवस वर्कआउट रूटीन फॉलो करुन नंतर वर्कआउट रूटीनचा कंटाळा करतात. काहीजण वर्कआउट रूटीन पाळल्यानंतर हलगर्जीपणा करतात. याशिवाय वर्कआऊट केल्याने वजन तर कमी होतेच यासोबतच आपल्या शरीरात इतर अवयवांमध्ये वाढलेले फॅट्स कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. रोज सकाळी व्यायाम केल्याने वजन तर कमी होतेच, तसेच शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यास मदत होते कारण व्यायामामुळे शरीरात उत्साह आणि ऊर्जा येते.

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

४. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा : - जेव्हा आपण लवकर उठतो असे म्हणतो, त्याचा अर्थ अपूर्ण झोप घेणे किंवा झोपेशी तडजोड करणे असा होत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी नेहमी पुरेशी ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. वजन कमी करण्यासाठी लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची स्वतःला सवय लावावी. प्रत्येकाने पुरेशी झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्यावर, आपल्याला दिवसभर उत्साही वाटेल. जर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटत असेल तर आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात देखील मदत होईल. पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी स्वत:साठी हेल्दी ब्रेकफास्ट बनवण्यापासून ते व्यायाम करण्यापर्यंत पुरेशी झोप घेणे हे देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

५. थोडावेळ उन्हात बसा :- व्हिटॅमिन-डीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे उन्हात बसणे. यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते. परंतु वजन कमी करण्यासाठी देखील हे खूप महत्वाचे आहे. लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा एक फायदा म्हणजे सकाळच्या सूर्यप्रकाशात बसण्याची संधी मिळते. म्हणून, नैसर्गिक जीवनसत्व डी मिळविण्यासाठी, काही मिनिटे उन्हात बसा. सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपल्याला निरोगी वाटेल. त्याचवेळी, सकाळचा सूर्यप्रकाश हार्मोनल संतुलन राखण्यास देखील मदत करतो, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात कोणतीही अडचण येत नाही.

टॅग्स :फिटनेस टिप्स