Join us  

योगा मॅट खरेदी करताना लक्षात ठेवा सुपर सिक्स गोष्टी; पाय सटकून अपघात टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 9:00 AM

6 Things You Should Know Before Buying A Yoga Mat : योगाभ्यास करताना योग्य योगा मॅट कशी निवडायची? त्यासाठीच या टिप्स.

योगाभ्यास हे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचे एक साधे सोपे माध्यम आहे. नियमित योगाभ्यासामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो आणि मन एकाग्र होते. आसनं करताना योगा मॅटची आवश्यकता असते.एक परफेक्ट योगा मॅट खरेदी करणे बऱ्याचदा कठीण होऊन बसते. कारण एकाचवेळी आपल्याला विविध वैशिष्ट्ये असलेली मॅट हवी असते.

आजकाल बाजारांत वेगवेगळ्या मटेरियलच्या योगा मॅट अगदी सहज उपलब्ध असतात. परंतु या सगळ्यात नेमकी कुठली योगा मॅट निवडावी हे आपल्या लक्षात येत नाही. योगा मॅट काही आपण वारंवार खरेदी करत नाही. त्यामुळे नेमकी ती कशी असावी, खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या, हे अनेक जणांना नेमकं समजत नाही. त्यामुळे मग मॅटची निवड चुकते. असं होऊ नये म्हणून काही गोष्टी तपासून घ्या(Buying guide for yoga mats, How to choose the right one?).

योगा मॅट कशी निवडायची?

१. मॅटची लांबी :- योगा मॅट खूप लांबही नको आणि खूप शाॅर्टही नको. सहा- साडेसहा फूट लांबीची योगा मॅट घेण्यास प्राधान्य द्यावे.

२. योगामॅटची जाडी :- योगा मॅटचा थिकनेस म्हणजेच तिची जाडी किती आहे, हे तपासणे आवश्यक आहे. काही योगा मॅट खूप जास्त पातळ असतात. पण अशा योगा मॅटमध्ये शॉक ॲबसॉर्बंट नसल्याने जॉईंट्ससाठी त्या अजिबातच आरामदायी नसतात. अशा खूप पातळ मॅट वापरून गुडघेदुखी किंवा इतर काही जाॅईंट्स दुखण्याचा त्रासही होऊ शकतो. 

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

३. सटकणारी मॅट नकाे :- योगा मॅट खरेदी करताना तिची ग्रीप कशी आहे, हे चांगले तपासून घ्या. कारण व्यायाम करताना मॅट जमिनीवरून सटकली किंवा पाय मॅटवरून घसरला तर अपघात होऊन दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे योगा मॅट सटकणारी नको. तिला व्यवस्थित ग्रीप असायला पाहिजे. 

४. घाम शोषून घेणारी :- योगा करताना, व्यायाम करताना निश्चितच घाम येणार. त्यामुळे आपली योगा मॅटही काही प्रमाणात स्वेट ॲबसॉर्बंट असायला हवी. 

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

५. इकोफ्रेंडली मॅट :- सध्या पर्यावरणाच्या वाढत्या समस्या पाहता प्रत्येक गोष्ट पर्यावरण पुरक असण्याची गरज आहे. त्यामुळे योगा मॅट खरेदी करताना ती देखील पर्यावरणपुरक असणे गरजेचे आहे. पर्यावरण पुरक योगा मॅटमध्ये खूप जास्त केमिकल्स नसतात. त्यामुळे त्या आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असतात. 

६. कॅरी करण्यासाठी सुलभ :- आजकाल योगा स्टुडिओमध्ये, पार्कमध्ये किंवा मोकळ्या जागी योगाभ्यास शिकवला जातो. घरातून अशा ठिकाणी जाताना आपल्याला योगा मॅट कॅरी करावी लागते. त्यामुळे योगा मॅट अशी असावी जी सहज गुंडाळून तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. शिवाय प्रवास करतानाही तुम्ही अशा प्रकारे तुमची योगा मॅट सोबत ठेवू शकता.

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

टॅग्स :फिटनेस टिप्स