Join us  

५ फळं आणि भाज्या रोज खा, कॅल्शियमचा खजाना-म्हातारपणातही शरीरातील सगळी हाडं राहतील ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 9:33 AM

Calcium Rich Foods : व्हिटामीन डी तुमच्या शरीरातील कॅल्शियम शोषण करण्यास मदत करते.  रोजच्या आहारात कोणते पदार्थ खाल्ल्यानं कॅल्शियम मिळते हे समजून घेतल्यास हाडं चांगली ठेवण्यास मदत होईल.

प्रोटीन्स आणि आयर्नसारखे पोषक तत्वांप्रमाणे कॅल्शियमसुद्धा शरीरासाठी आवश्यक असते. कॅल्शियमत दात, हाडं आणि मांसपेशींच्या विकासासाठी महत्वाचे असते. ५० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना रोज १ हजार मिलीग्राम आणि पुरूषांना १ हजार २०० मिलिग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते (Calcium Rich Foods) कॅल्शियम रक्त वाहिन्या आणि संपूर्ण रक्त शरीरात रक्त पुरवठा सुधारण्यास मदत करतो. यामुळे हार्मोन रिलीज होण्यास मदत होते. यामुळे व्हिटामीन डी तुमच्या शरीरातील कॅल्शियम शोषण करण्यास मदत करते.  रोजच्या आहारात कोणते पदार्थ खाल्ल्यानं कॅल्शियम मिळते हे समजून घेतल्यास हाडं चांगली ठेवण्यास मदत होईल. (Calcium rich fruits that make yout bones teeth and muscles strong)

किव्ही

हाय कॅल्शियम रिच फूड्सच्या यादीत किव्हीचा समावेश होतो. नियमित किव्हीचे सेवन केल्यानं शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. याशिवाय हाडं मजबूत राहतात. एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुासर जवळपास ६०० मिलीग्राम कॅल्शियम यात असते. याचा तुम्ही ज्यूस बनवूनही पिऊ शकता. 

संत्री आणि अननस

संत्री सर्वांनाच खायला आवडतात. एआयएचच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन सी युक्त संत्री कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. यात व्हिटामीन डी सुद्धा मोठ्या प्रमाणत असते.  कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत करण्यास फायदेशीर ठरते.

बेरीज

जांभूळ, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी ही फलं कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. ही फळं तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता. यात २० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियम असते.

भेंडी

भेंडीची भाजी अनेकांना खायला खूप आवडते. पण भेंडी कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. भेंडीमध्ये जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शियम असते.

केल आणि ब्रोकोली

केल कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे.  १ कप शिजवलेल्या केलमध्ये १७७ मिलिग्राम कॅल्शियम असते. तर कच्चे केल ५३ मिलीग्राम कॅल्शियम देते. तुम्ही सॅलेड्च्या स्वरूपात हे खाऊ शकता.  एक कप कच्य्या ब्रोकोलीमध्ये ४३ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य