Join us  

अशक्तपणा, थकवा येतो-दिवसभर झोप येते? ६ पदार्थ खा, ताकद वाढेल, निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 3:29 PM

Calcium rich foods in your diet for muscles growth :

भरभरून कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळवण्यासाठी लोक मांसाहाराचा समावेश आहारात करतात तर काहीजण अंडी खातात. काहीजणांना याची एलर्जी असते किंवा ते व्हेजिटेरियन असतात. (Health Tips) अशावेळी शरीराला ताकद मिळण्यासाठी नक्की काय खायचं असा प्रश्न पडतो. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही व्हेज पदार्थ खाऊ शकता. जे तुम्हाला पुरेपूर पोषण देण्यास मदत करतील. (5 protein and calcium rich foods in your diet for muscles growth)

केळी 

जर तुम्ही अंडी खात नसाल तर केळी हा एक उत्तम पर्याय आहे. केळी मायक्रो न्युट्रिएंट्ससनी परीपूर्ण असते. वेगवेगळ्या प्रकारांनी केळी तुम्ही खाऊ शकता. केळ्यात कार्बोहायड्रेट्स, व्हिटामीन ए व्हिटामीन ए, सी आणि बी-१, आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक असते.

डाळी

डाळी खासकरून मसूर डाळ उर्जेचा खजिना आहे. डाळीत प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन, मिनरल्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. यामुळे डाळ अधिक चवदार होते.

बदाम

बदामाला एक सुपरफूड मानले जाते. कारण यात प्रोटीन्स, फायबर्स, हेल्दी ऑईलल आणि  व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. रोज एक मूठ बदाम खाल्ल्यानं तुमच्या शरीराला आवश्यक पोषक  तत्व मिळतात. बदाम रात्री भिजवून सकाळी सालं काढून  खाल्ल्यास अधिकाधिक फायदे मिळतील.

दही

उन्हाळ्याच्या दिवसात लोक रोजच दह्याचे सेवन करतात. तुम्ही पावसाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा दही खाऊ शकता. यात प्रोटीन्स, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटामीन ए आणि व्हिटामीन बी १२ यांसारखी पोषक तत्व असतात.

चिया सिड्स

या  बिया सर्व आवश्यक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात. तुम्ही त्यांना पाण्यात भिजवून डिटॉक्स ड्रिंक म्हणून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी इतर कोणत्याही अन्नासोबत घेऊ शकता. चिया सिड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. हे पोषक तत्व शरीराच्या कार्याला चालना देतात.

चणे आणि गूळ

चणे आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारची कमजोरी दूर होऊन शरीर बलवान बनते. यामुळे अॅनिमियासारखे आजार होत नाहीत. ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यांना दररोज हरभरा-गूळ खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. हरभरा-गुळ रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स