Join us

हिवाळ्यात तूप खाल्लं म्हणून खरंच वजन वाढत का ? बघा एक्स्पर्ट सांगतात यामागचं खरं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 18:49 IST

Can Eating Ghee Increase Weight In Winter Expert Tells : Will Ghee Increase Weight : Ghee In Winters : Why ghee is a must have in winters : Is it good to eat ghee in winter : वजन वाढेल या भीतीने हिवाळ्यात तूप खाणं टाळताय, बघा तूप कळल्याने नेमकं होत काय?

काही मोजके पदार्थ हिवाळयात खाल्ल्याने याचे आपल्या आरोग्याला अतिशय फायदे होतात. या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे नेहमीच्या वापरातील 'साजूक तूप'. थंडीच्या दिवसांत (Can Eating Ghee Increase Weight In Winter Expert Tells) आपण शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर देतो. हिवाळ्यात जेवणात तूप वापरल्याने जेवणाची चव तर दुप्पट होतेच, शिवाय आरोग्यालाही फायदा होतो. तुपात (Will Ghee Increase Weight) हेल्दी फॅट असण्यासोबतच शुद्ध देशी तुपात (Ghee In Winters) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता देखील असते. आयुर्वेदातही हिवाळ्यात तूप खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण तूप शरीराला आतून उबदार ठेवतं(Why ghee is a must have in winters).

तूप शरीराला शक्ती देतं. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, स्मरणशक्ती वाढवते, त्वचा निरोगी ठेवते. तसेच शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. एवढेच नाही तर हिवाळ्यात वारंवार खोकला आणि सर्दी होत असेल तर त्यावरही फायदा होतो, असे हे बहुगुणी तूप हिवाळ्यात खाणे फायदेशीर ठरते. परंतु वजन वाढेल या विचाराने बरेच लोक हिवाळ्यात तूप खाणं (Is it good to eat ghee in winter) टाळतात. तुपाने शरीरात चरबीचे प्रमाण वाढू लागेल आणि आपण जाड होऊ या भीतीने अनेकदा आपण तूप खायला नकार देतो. ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलमधील पोषण आणि आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. किरण सोनी यांनी 'ओन्ली माय हेल्थला' दिलेल्या मुलाखतीनुसार, हिवाळ्यात तूप खाल्ल्याने खरंच  वजन वाढते का ? ते पाहूयात.

हिवाळ्यात तूप खाल्ल्याने वजन वाढत का ? 

तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात तूप खाल्ले तर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. जर तुम्ही योग्य प्रमाणांत तूप खात असाल तर आपले वजन वाढणार नाही. हिवाळ्यात तूप खाणे अधिक फायदेशीर आहे, परंतु तूप खाण्याचे प्रमाण हे देखील योग्य असले पाहिजे. जर तुम्ही भाजी, डाळ किंवा खिडची मध्ये तूप मिसळून खात असाल तर ते आरोग्यासाठी फायदेशीरच असते. याउलट जर तुम्ही तुपात तळलेले, भाजलेले असे तेलकट, तुपकट पदार्थ खात असाल तर तुमचे वजन नक्कीच वाढेल. 

Winter Food : गारठवणाऱ्या थंडीत खा गूळ-शेंगदाण्याचा पराठा, पोटभर नाश्ता-दिवसभर वाटेल एनर्जेटिक...

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या रिसर्चनुसार, तुपामध्ये असलेले फॅटी अ‍ॅसिड शरीरातील उर्जेचे संतुलन राखण्यास मदत करतात आणि कर्करोग, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या आजारांचा धोका कमी करतात असे दिसून आले आहे. तुपात हेल्दी फॅट्स असतात, विशेषत: ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. हिवाळ्यात तुम्ही रोज तूप खाल्ल्यास चयापचय क्रियेचा वेग वाढेल आणि ऊर्जेची पातळी चांगली राखली जाईल.

फिट राहण्यासाठी मलायका अरोरा करते वॉटर थेरपी, ही थेरपी नक्की असते काय?

हिवाळ्यात तूप खाण्याचे फायदे... 

१. आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले :- तुपामध्ये ब्युटीरेट हे शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिड असते. हे आतडे आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे  आपले शरीर अन्नातील सर्व पोषक तत्वे शोषून घेण्यास सक्षम होते.

२. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी :- हिवाळ्यात तूप खाल्ल्याने शरीर उबदार राहते. हे शरीर आणि त्वचा हायड्रेटेड ठेवते ज्यामुळे हिवाळ्यात संसर्गाचा धोका कमी होतो. तूप खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांचा धोका कमी होतो.

३. चांगल्या ऊर्जेसाठी :- तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे हिवाळ्यात ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे थकवा, आळस आणि अशक्तपणा यासारख्या समस्या हिवाळ्यात उद्भवत नाहीत.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स