Join us  

कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 6:11 PM

Can House Cleaning Help You Lose Weight : ३ घरगुती कामं, वजनाचा काटा येईल सर्रकन खाली, काही दिवसात दिसाल सुडौल

वजन वाढलं की बरेच जण टोमणे (Weight Loss) मारतात. सुटलेलं पोट, मांड्या, कंबरेचा वाढलेला घेर,  शिवाय वाढलेल्या वजनामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुख्य म्हणजे जर आपण फक्त व्यायाम करून डाएट फॉलो करत नसाल तरीही वजन वाढू शकते. आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही (Fitness). जर आपलं बैठी काम असेल तर, आपण घरातील काही कामे करून वजन कमी करू शकता. या ३ प्रकारच्या कामांमुळे वजन कमी होईलघरातील कोणती कामे केल्याने वजन कमी होईल, पाहा(Can House Cleaning Help You Lose Weight).अर्थात हा नियम स्त्री-पुरुष दोघांनाही लागू आहे. घरकाम दोघांनी करायला हवं, तर दोघांचंही वाढलेलं वजन घटू शकतो. त्यात सातत्यही हवं.

 

पायऱ्या चढणे-उतरणे

वजन कमी करण्यासाठी आपण पायऱ्यांचा व्यायाम करू शकता. जर आपण नियमित १० ते १५ मिनिटांसाठी पायऱ्यांचा व्यायाम केलात तर नक्कीच वजन कमी होईल, शिवाय संपूर्ण शरीराची हालचाल होईल. मुख्य म्हणजे या व्यायामुळे आपले मसल्स अधिक बळकट होतात.

वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

गार्डनिंग

गार्डनिंग हा एक व्यायामाचा प्रकार आहे. माती खणण्यापासून ते रोपट्याला पाणी देण्यापर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये व्यायाम होतो. ज्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. मुख्य म्हणजे गार्डनिंग करताना आपल्या संपूर्ण बॉडीची हालचाल होते.

खा मेथी व्हा बारीक! हिवाळ्यात मेथी खा भरपूर - पोट होईल कमी आणि वजनही उतरेल

स्वतःचे कपडे धुणे

आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीनचा वापर होतो. मशीनमध्ये कपडे झटपट धुतले जातात. शिवाय यामध्ये काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. पण जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, वॉशिंग मशीनचा वापर न करता, हाताने कपडे धुवा. हाताने खाली बसून कपडे धुतल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ज्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स