Join us  

आईस्क्रीम खाऊन ३० किलो वजन कमी होवू शकते का? एका डॉक्टर महिलेचा अनुभव काय सांगतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 1:01 PM

Diet Plan फॅट टू फिटचा ट्रेंड सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे, एका महिलेने चक्क आईस्क्रिम आणि चहाचा डाएटमध्ये समावेश केला आहे.

आजकाल सगळ्यांनाच फिट राहण्याचे महत्व पटले आहे. फिट राहिल्याने कोणतेही आजार शरीरात प्रवेश करत नाही. फॅट टू फिटचा ट्रेंड सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. शरीराला घातक ठरतील असे पदार्थ बहुतांश लोकं खाण्यास टाळतात. काहीजण खाणे-पिणे सोडून देतात आणि काही जिम किंवा ट्रेडमिलवर तासंतास घाम गाळतात. पण आपण कधी असं एकले आहे का ? की चहा पिऊन आणि आईस्क्रीम खाऊन वजन कमी होऊ शकते. हो, हे खरं घडलं आहे. एका महिलेने दिवसाला तीन कप चहा पिऊन वजन कमी केले आहे. यासह तिने आपल्या डाएटमध्ये आईस्क्रिमचा देखील समावेश केला होता. चला तर मग ती महिला कोण होती आणि तिने आपल्या डाएटमध्ये चहा आणि आईस्क्रिमचा समावेश करून कसे वजन कमी केले याची माहिती जाणून घेऊयात.

दररोज दोन ते तीन कप चहा

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या कश्मी शर्मा या मूळच्या ऋषिकेश, उत्तराखंड येथील राहणाऱ्या आहेत. कश्मीचे सुरुवातीला वजन 85 किलो होते. पण वजन कमी करण्यासाठी तिने खाणे - पिणे सोडले नाही. तिने ट्रेडमिलवर तासंतास घाम देखील गाळला नाही. ती चक्क दररोज नियमित दोन ते तीन कप चहा प्यायची आणि वीकेंडला आईस्क्रीम खायची. जेव्हा तिला तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले, “गर्भधारणेनंतर अचानक तिचे वजन वाढू लागले. त्यामुळे पाठदुखी आणि इतर शरीराच्या संबंधित समस्या सुरू झाल्या, त्यामुळे तिने तातडीने आपला डाएट प्लॅन बनवला आणि त्याला फाॅलो करायला देखील सुरूवात केली.

व्यायाम आणि आहार योजना

प्रसूती झाल्यानंतर तिने लगेच वजन कमी केले नाही. काही दिवस तिने आपल्या बाळाचे पालन पोषण केले. शरीराच्यानिगडीत जेव्हा अनेक समस्या उद्धभवू लागल्या तेव्हा तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. पण बिझी शेड्युलमधून वर्कआऊटसाठी वेळ काढणं कठीण होतं. पंरतु, वेळात वेळ काढून तिने युट्युबवर पाहून वर्कआउट करायला सुरुवात केली. ज्यामुळे तिच्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. तेव्हा युट्युबवर व्हिडिओ पाहून व्यायाम न करता तिने लगेच एका प्रशिक्षकाची व्यवस्था केली. प्रशिक्षकाने वर्कआउट आणि डाएट प्लॅन तयार केला. त्यानंतर 18 महिन्यात कश्मीने 30 किलो वजन कमी केले.

आहार

डॉक्टर कश्मी सांगतात की, “वजन कमी करण्यासाठी मी कॅलरीजची संख्या कधी वाढवायची तर कधी कमी करायची. मी चहाची शौकीन असल्याने मी चहा कधी सोडला नाही. मी दररोज दोन ते तीन कप चहा प्यायचे. यासोबत वीकेंडला आईस्क्रीम देखील खायचे. यासह डाईटमध्ये -

 

नाश्ता - ५० ग्राम तांदूळ, ५ ग्राम तूप, १५० मिली. लो फॅट दुध, ५० ग्राम पनीर.

दुपारच्या जेवणाला - ५० ग्राम गहूचे पीठ, ५ ग्राम तूप, १५० ग्राम भाज्या, ३० ग्राम डाळ

रात्रीच्या जेवणाला - ४० ग्राम तांदूळ, १५० ग्राम भाज्या, ५ ग्राम तूप, १०० ग्राम पनीर या पोषक भाज्या आणि डाळींचा समावेश केला. जेणेकरून वजन नियंत्रणात आले आणि अतिरिक्त चरबी देखील लवकर कमी झाली.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यआहार योजनाहेल्थ टिप्स