पाणी शरीरासाठी आवश्यक. 'जल है तो जीवन है' (Water Benefits). अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरातील गंभीर आजारांची समस्या कमी होते (Health Care). शिवाय असे म्हटले जाते की, वेट लॉससाठी मदत होते. पण खरंच पाणी जास्त प्यायल्याने वजन कमी होते? प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची गरज असते (Belly Fat).
आपल्या शरीराचा ५० ते ७० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे (Weight Loss). पाणी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकते आणि शरीराचे तापमान संतुलित राखते. ज्यामुळे अतिरिक्त चरबीही कमी होते. पण मग दिवसभारत नेमकं किती पाणी प्यावे? याची माहिती अपोलो हॉस्पिटल, बेंगळुरू येथील मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी दिली आहे(Can You Lose Belly Fat by Drinking Water?).
जास्त पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो?
डॉक्टर सांगतात, 'पाण्याशिवाय आपले शरीर अपूर्ण आहे. पण फक्त पाण्यामुळेचं वजन घटेल असे नाही. काही लोक वजन कमी करण्यासाठी काहीही खात नाही. नुसतं पाणी पितात. ही पद्धत योग्य नाही. जर आपण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर, किडनी जास्त पाणी बाहेर काढू शकत नाही.
केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त
दुसरीकडे, अतिरिक्त पाण्यामुळे शरीरातील सोडियम पातळ होऊ लागते, व शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. ज्यामुळे हायपोनेट्रेमिया होऊ शकते.
दिवसभर किती पाणी प्यावे?
वजन, लिंग, वय यावर त्या व्यक्तीच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, हे समजते. जे लोक जास्त व्यायाम करतात. जे खेळाडू आहेत. त्यांच्या शरीराला जास्त पाण्याची गरज असते. ज्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण थंड आहे, ते लोक कमी प्रमाणात पाणी पितात. त्यामुळे वातावरणावर देखील अवलंबून आहे.
लालबुंद कलिंगड बिंधास्त खाताय? त्या कलिंगडाला इंजेक्शन तर टोचलेलं नाही? जीवावर बेतेल कारण..
अमेरिकन नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स, इंजिनीअरिंग अँड मेडिसिनच्या मते, पुरुषांनी दिवसातून १५ कप किंवा साडेतीन लिटर द्रवपदार्थ घ्यावे. तर महिलांना दररोज २.७ लिटर द्रवपदार्थाची गरज असते. पण हा काही निश्चित नियम नाही. शरीरानुसार गरजा बदलू शकतात.