वजन कमी करण्यासाठी, फिट राहण्यासाठी बरेचजण सकाळी मॉर्निंग वॉक करण्याला प्राधान्य देतात. एवढेच नव्हे तर काहीजण जिम, योगा, ॲरोबिक्स यांसारख्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणे पसंत करतात. आजकाल बाजारांत बरीच अशी उपकरणे आली आहेत ज्याचा वापर करून आपण स्वतःला फिट अँड हेल्दी ठेवू शकतो. या उपकरणांपैकी मनगटावरील स्मार्टवॉच हे एक खास उपकरण आहे. या स्मार्टवॉचमध्ये आपले हार्टबीटस, बर्न केलेल्या कॅलरीज, आपण दिवसभरात किती पावले चाललो या सगळ्याचा योग्य रेकॉर्ड ठेवला जातो. आपण इतके चालतो तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही, व्यायाम करायची गरज नाही असे अनेकांना वाटते(Can walking 10,000 steps a day replace going to the gym?).
आपण बरेचदा ऐकले असेल की दिवसभरात किमान (Do We Really Need to Take 10,000 Steps a Day for Our Health?) दररोज १०,००० पावले तरी चालवीत. यामुळे फिट राहण्यास मदत होते. आजकाल तर ही १०,००० पावले मोजणे हे या मनगटावरील स्मार्टवॉचमुळे अगदी सहज सोपे झाले आहे. सकाळी एकदा का हे स्मार्टवॉच मनगटावर घातले की ते काढेपर्यंत आपण किती पावले चाललो हे दिवसाअखेरी समजते. आपल्यापैकी काहीजण असे मानतात की दिवसभरात १०,००० पावले (Facts you should know about the '10,000 steps' rule) चालून पूर्ण केल्यास आपल्याला वर्कआऊट किंवा इतर शारीरिक व्यायामाची गरज भासत नाही, परंतु हे कितपत खरे आहे ? की खोटे ? फोर्टिस हॉस्पिटल वसंत कुंज, दिल्लीचे प्रधान संचालक गुरिंदर बेदी यांनी या विषयांवर अधिक मार्गदर्शन केले आहे(can you replace workout with walking 10k steps a day expert explains benefits of walking for the body ?).
जेव्हा आपण दिवसाभरातून किमान १०,००० पावले चालतो तेव्हा नक्की काय होते ?
आजकाल, महागडी स्मार्टवॉचेस आणि आपल्या चालण्याचा अगदी तंतोतंत हिशोब ठेवणारे अनेक प्रकारचे मोबाईल अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपण एका दिवसात किती पावले चाललो आणि किती कॅलरीज बर्न केल्या हे आपण सहज पाहू शकतो. इतकंच नाही तर सोशल मीडियावर लोक एकमेकांना रोजची किती पावले चाललो हे मोजण्याचे आव्हानही देतात. डॉक्टर गुरिंदर बेदी यांच्या म्हणण्यानुसार, रोज १० हजार पावले चालणे हे हृदय आणि श्वासोच्छवासाच्या तंदुरुस्तीसाठी अतिशय फायदेशीर आहे यात शंका नाही. परंतु जर आपण रोज १० हजार पावले चालत असाल तर एकाच वेळी ५ हजार पावले पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो.
व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...
दिवसभरात १०,००० पावले चालणे हे व्यायामाची जागा घेऊ शकते का ?
डॉक्टर गुरिंदर बेदी यांच्या सांगण्यानुसार, सध्या तरुणांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. ज्याचे एक मुख्य कारण म्हणजे दिवसभर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणे आणि व्यायामासाठी वेळ न काढणे हे आहे. अशा परिस्थितीत वयाची ४० वर्षे पूर्ण होण्याआधीच तरुणांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी अशा समस्या दिसू लागतात. दररोज १० हजार पावले चालल्याने आपले शरीर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते.
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...
भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...
डॉक्टर गुरिंदर बेदी यांनी सांगितले की, कार्डिओ रेस्पिरेटरी बेसिक वर्कआउटसाठी दररोज १० हजार पावले चालणे फायदेशीर आहे. परंतु पाठ, मणका व सांध्यांच्या आरोग्यासाठी दररोज फक्त चालणे पुरेसे नाही. दररोज चालण्याव्यतिरिक्त, आपल्याला मान, पाठ, खांदे, नितंब आणि गुडघे यांचे व्यायाम देखील करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी योग हा एक चांगला पर्याय आहे. डॉक्टरांनी सांगितले की वयानुसार स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपले स्नायू मजबूत ठेवता येतील.