Lokmat Sakhi >Fitness > तुम्हाला 10 सेकंद एका पायावर उभं राहता येतं का? नसेल तर मरण जवळ - सांगतोय नवा अभ्यास

तुम्हाला 10 सेकंद एका पायावर उभं राहता येतं का? नसेल तर मरण जवळ - सांगतोय नवा अभ्यास

शरीराचा तोल सांभाळणं वाटतं तेवढं सोपं नाही, एकदा ही टेस्ट करुन तर पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:55 PM2022-06-24T17:55:23+5:302022-06-24T17:58:22+5:30

शरीराचा तोल सांभाळणं वाटतं तेवढं सोपं नाही, एकदा ही टेस्ट करुन तर पाहा...

Can you stand on one foot for 10 seconds? If not, death is near - says a new study | तुम्हाला 10 सेकंद एका पायावर उभं राहता येतं का? नसेल तर मरण जवळ - सांगतोय नवा अभ्यास

तुम्हाला 10 सेकंद एका पायावर उभं राहता येतं का? नसेल तर मरण जवळ - सांगतोय नवा अभ्यास

Highlights२००९ पासून २०२२ पर्यंत १७०० लोकांचा अभ्यास यामध्ये करण्यात आलाआपले आरोग्य चांगले आहे की नाही ते सांगते ही साधी सोपी टेस्ट

आपण नियमितपणे चांगला आहार घेतला, ठराविक तासांची झोप घेतली आणि पुरेसा व्यायाम केला तर आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होते, हे आपल्याला माहित आहे. आपल्याला दिर्घायुष्य हवं असेल तर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित असायला हवं. आपली जीवनशैली ही आपले आरोग्य उत्तम ठेवण्यात अतिशय महत्ताचा रोल बजावत असल्याने ती चांगली असणे गरजेचे आहे. आपण अनेकदा फक्त आजारी पडल्यावरच डॉक्टरांकडे जातो. पण त्याआधीही आपली तब्येत ढासळलेली असू शकते. आता हे आपल्याला कळणार कसं? तर त्यासाठी घरच्या घरी एक सोपी टेस्ट करुन आपल्याला आपल्या फिटनेसविषयी समजू शकणार आहे. आता ही टेस्ट नेमकी काय आणि ती कशी करायची ते पाहूया (Stand on One Leg for 10 Seconds).

(Image : Google)
(Image : Google)

ब्राझिलमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार एखादी व्यक्ती एका पायावर किती वेळ उभी राहू शकते यावरुन तिचे आयुष्य किती असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. या संशोधनानुसार ५० वर्षाहून जास्त वय असलेल्या व्यक्ती १० सेकंद एका पायावर उभ्या राहू शकत नसतील तर पुढच्या १० वर्षात त्यांना मृत्यू येण्याची शक्यता दुपटीने वाढते. या १० सेकंदांच्या टेस्टच्या माध्यमातून लोकांच्या मृत्यूविषयी अंदाज लावता येईल असे यामध्ये म्हणण्यात आले आहे. त्यामुळे या टेस्टला रुटीन चेकअपमध्ये सहभागी करुन घ्यायला हवे असे संशोधकांचे म्हणणे आहे. २००९ पासून २०२२ पर्यंत १७०० लोकांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. यात ५१ ते ७५ वर्ष वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. यातील ५१ ते ५५ वयोगटातील ५ टक्के, ५६ ते ६० वयोगटातील ८ टक्के, ६१ ते ६५ वयोगटातील १८ टक्के आणि ६६ ते ७० वयोगटातील ३७ टक्के तर ७१ ते ७५ वयोगटातील ५४ टक्के लोकांना अशाप्रकारे १० सेकंद एका पायावर उभे राहणे जमले नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

दैनंदिन जीवनात आपल्याला कारमधून बाहेर पडण्यासाठी, जीने चढण्यासाठी किंवा इतरही काही कामे करण्यासाठी अनेकदा एका पायावर उभे राहावे लागते. एका पायावर उभे राहण्यासाठी मेंदूचे कार्य सुरळीत असणे आवश्यक असते, तसेच आपल्या पेशींची ताकद आणि रक्तप्रवाह सुरळीत असणेही आवश्यक असते. त्यामुळे हे सगळे योग्य पद्धतीने असेल तर आपण सहज १० सेकंद एका पायावर उभे राहून आधार न घेता स्वत:चा तोल सांभाळू शकतो. पण तसे नसेल तर आपला तोल जाण्याची शक्यता असते असे या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे. 


 

Web Title: Can you stand on one foot for 10 seconds? If not, death is near - says a new study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.