Lokmat Sakhi >Fitness > खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट

खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट

Animal Walk Yoga : प्राणी चालतात तसं चालत व्यायाम केला तर व्यायाम मजेशीरही होतो आणि फिटनेसही वाढतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 01:17 PM2023-01-12T13:17:06+5:302023-01-12T14:07:59+5:30

Animal Walk Yoga : प्राणी चालतात तसं चालत व्यायाम केला तर व्यायाम मजेशीरही होतो आणि फिटनेसही वाढतो.

Can you walk like a crab or a duck or a cat? A new way of exercising will keep you fit | खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट

खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट

'दिल तो पागल है' या सुप्रसिद्ध चित्रपटांतील 'घोडे जैसी चाल... हाथी जैसी दुम...' हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. पण खरंच कल्पना करा की आपण मानवाने आपली चाल सोडून प्राण्यांसारखे चालण्यास सुरुवात केली तर?... तर काय होईल? आपल्यापैकी काही जण फिट राहण्यासाठी जिम, योगा, झुंबा किंवा अजून काही वेगेवगेळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करतात. जर आपल्याला कोणी सांगितले की प्राणी जसे चालतात तसे आपण चालल्याने फिट अँड फाईन राहू शकतो. तर यावर तुमचा विश्वास नाही बसणार. पण हे खरं आहे की, प्राण्यांची चाल फॉलो केल्याने आपण आपले आरोग्य सुधारु शकतो. दररोजचा व्यायाम किंवा योगा करत असताना त्याच्यासोबतच आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. खेकडा, बदक, माकड, मुंगी, अस्वल यांच्याप्रमाणे चालून आपण आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो. प्राण्यांची चाल फॉलो करून आपण कसे फिट राहू शकतो ते समजून घेऊयात(Animal Walk Yoga).

प्राण्यांची चाल फॉलो करून आपण कसे फिट राहू शकतो याबाबतचा एक व्हिडीओ carlaf.yoga या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.  

नक्की काय करता येऊ शकत ? 

१. क्रॅब वॉक (Crab Walk) - क्रॅब वॉक म्हणजे खेकड्याची चाल आपण करू शकतो. दोन्ही हात आणि दोन्ही पाय याच्यावर उताणे होऊन हात व पाय यांच्या मदतीने दोन पावले पुढे आणि दोन पावले मागे चाला. तुमच्या शरीराचे पूर्ण वजन तुमच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर असले पाहिजे. यामुळे तुमचे हात आणि पायांचे मसल्स टोन्ड होण्यास मदत होईल.   

२. डक वॉक (Duck Walk) -  डक वॉक म्हणजे बदकाची चाल करून आपण फिट राहू शकतो. दोन्ही पायांच्या तळव्यांवर जोर देऊन उभे राहून गुढघ्यात वाकून खाली बसा. दोन्ही हात जोडून नमस्कार करा. गुडघ्यात वाकून बदकासारखे चाला. खाली वाकल्यावर दोन्ही हात असे जोडा की तुमचे दोन्ही पायांचे गुडघे त्यामध्ये बरोबर अडकतील. 

३. गोरिला वॉक (Gorilla Walk) -  गोरिला वॉक करताना आपल्याला चक्क लहान मुलांसारख्या माकड उड्या मारण्याचा आनंद घ्यायचा आहे. गोरिला वॉक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांचे पंजे आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यासमोर येतील असे कमरेतून वाका. यांनतर हातांच्या पंज्यावर जोर देऊन पंजे जागचे न हलवता पायांच्या मदतीने उड्या मारा. उड्या मारल्याने तुमच्या सर्वांगाचा व्यायाम होईल. 

४. अँट वॉल्क (Ant Walk) -  अँट वॉल्क करताना आपल्याला मुंगीप्रमाणे पायांच्या बोटांवर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँट वॉल्क करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांचे पंजे आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यासमोर येतील असे कमरेतून वाका. याच स्थितीत राहून हातांच्या पंज्यावर जोर देऊन फक्त पायांच्या बोटांवर जोर देऊन पुढे - मागे चालण्याच्या प्रयत्न करा. यामुळे पायांचा व पायांच्या बोटांचा चांगला व्यायाम होऊन आपले पाय टोन्ड व हाडे बळकट होण्यास मदत होते. 

५. अस्वलाची चाल (Bear Crawl) - लहान बाळ जसे दोन्ही हात आणि पायांवर रांगते तसेच आपल्याला जमिनीवर रांगत पुढे चालायचे आहे. अस्वल चालताना जसे दोन्ही हात आणि दोन्ही पायांचा वापर करते त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा तसेच चालायचे आहे. अस्वलासारखे चालताना दोन्ही हात आणि दोन्ही पायांचे गुडघे यांच्या मदतीने जमिनीवर चाला.

Web Title: Can you walk like a crab or a duck or a cat? A new way of exercising will keep you fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.