Join us  

सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय, जाग येईल लवकर- झोपही होईल पूर्ण-वाटेल फ्रेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 5:48 PM

What To Do To Get Complete Sleep: आलार्म वाजताच तो बंद करून आणखी झोपावं वाटतं, उठलं तरी पुन्हा कधी झोपू असं होऊन जातं... तुम्हीही हा अनुभव घेता ना? असं होऊ नये म्हणून बघा या काही खास टिप्स...(special tips and tricks for sound sleep)

ठळक मुद्देझोप पुर्ण होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल, अंगातली सगळी सुस्ती निघून जाईल.

पावसाळी हवेमुळे वातावरणात आलेला गारवा किंवा हिवाळ्याच्या दिवसांतला थंडीचा कडाका.. हे दोन्ही ऋतू असे आहेत की त्या काळात सकाळी लवकर उठावसंच (Can't wake up early in the morning) वाटत नाही. वातावरणात इतका मस्त गारठा असतो की पांघरूण आणखी लपेटून घ्यावं आणि आणखी थोडा वेळ झोपावं असं वाटतं. सकाळचा आलार्म वाजताच अगदी झोपेतही आपली चिडचिड होते आणि त्याचा रागात आपण तो खाड्कन बंद करून टाकतो. कारण एकतर उठावंच वाटत नाही आणि उठलं तरी अंगातली सुस्ती काही जात नाही. (how to wakeup early in the morning with a fresh mood)

 

थोड्याबहुत फरकाने हा अनुभव जवळपास सगळ्यांनीच घेतलेला असतो. ज्यांना सकाळी फार काही गडबड नसते, ते असं निद्रासुख घेऊ शकतात. पण ज्यांना कामाला पळायचं असतं, त्यांना मात्र चडफडतच का होईना, पण उठावं लागतंच. सकाळी स्वत:वरच अशी चिडचिड झाली आणि झोप पुर्ण झाली नाही तर मग सगळा दिवसच बोअर जातो. म्हणूनच हे काही उपाय करून बघा. झोप पुर्ण होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल, अंगातली सगळी सुस्ती निघून जाईल. हे उपाय इन्स्टाग्रामच्या gree_yogabhyasi या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. 

 

सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटण्यासाठी..१. रात्रीचं जेवणरात्रीचं जेवण तुम्ही कधी घेत आहात, यावर तुमची झोप खूप जास्त अवलंबून असते. रात्री उशिरा जेवणाची सवय असेल तर त्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होतो. जेवढं उशिरा जेवाल तेवढं उशिरा त्याचं पचन सुरू होतं. त्यामुळे रात्री बराच वेळ अस्वस्थ वाटतं आणि शांत झोप लागत नाही. रात्री उशिराने शांत झोप लागते आणि मग लगेच पहाटे उठण्याची वेळ होते. त्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण ८ वाजेच्या आधी झालंच पाहिजे, याची काळजी घ्या.

डायबिटिस असेल तर नाश्ता काय कराल? शुगर नियंत्रणात ठेवणारा करा नाश्ता, बघा रेसिपी २. पाय स्वच्छ धुवारात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवा. उन्हाळा असेल तर थंड पाणी वापरा आणि पावसाळा- हिवाळा असेल तर कोमट पाणी वापरा. यामुळे पाय तर स्वच्छ होतीलच पण तळपायांत असणाऱ्या नस मोकळ्या झाल्याने सगळा थकवा दुर झाल्यासारखा वाटेल आणि लगेच शांत झोप लागेल.

 

३. तळपायांना मसाजतळपायांचा आणि मन शांत होण्याचा, रिलॅक्स होण्याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मन शांत करण्यासाठी पाय धुतल्यानंतर अंथरुणावर बसूनच तळपायांना ३ ते ४ मिनिटे मसाज करा. मसाज करण्यासाठी साध्या खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालेल. यामुळे डोकंही शांत होईल आणि रिलॅक्स वाटेल. या क्रियेला पादअभ्यंगम म्हणतात.

मीठ जास्त खाणं जीवघेणं! राेज किती मीठ खाणं तब्येतीसाठी आवश्यक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..४. दिर्घश्वसनझोपण्याआधी तुमच्या बेडवर बसूनच ५ मिनिटांसाठी दिर्घ श्वसन करा. दिर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. श्वासासोबत आपण मनातले सगळे नकारात्मक विचार, अशांतता, ताण शरीराबाहेर टाकून देत आहोत, असा विचार करा. यामुळे मन शांत होईल, तणाव दूर होईल आणि शांत- पुरेशी झोप लागेल.

 

५. फोनचा वापररात्री बेडवर गेल्यानंतर अनेकांना मोबाईल बघण्याची सवय असते. ही सवय झोपेचं नुकसान करणारी आहे. यामुळे रात्री शांत झोप लागत नाही आणि त्यामुळे सकाळी फ्रेश जाग येत नाही. त्यामुळे रात्री बेडरुममध्ये गेल्यावर मोबाईल बघणं स्ट्रिक्टली बंद करा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स