अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) तिच्या वर्कआऊटबाबत, डाएटबाबत (workout and diet) अतिशय काळजी घेते. त्यामुळेच तर वयाच्या पन्नाशीच्या आसपास येऊन ठेपलेली भाग्यश्री अजूनही एवढी स्टनिंग आणि तरुण दिसते. फिटनेस (fitnesss) बाबतची जागरुकता आपल्या चाहत्यांमध्येही यावी, यासाठी दर मंगळवारी न चुकता भाग्यश्री तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर करत असते. यात ती कधी व्यायामाची माहिती देते तर कधी आहारासंबंधी काही टिप्स देते.. यावेळी भाग्यश्रीने जो व्हिडिओ (viral video) शेअर केलाआहे, त्यात तिने कार्डिओ वर्कआऊट सांगितले आहे.
भाग्यश्रीने सांगितलेले कार्डिओ वर्कआऊट
व्यायाम १
दिसायला हा व्यायाम सोपा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र तेवढाच अवघड आहे. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात थोडं अंतर घ्या. आता खाली वाकून उजवा तळहात डाव्या पाऊलाला तर डावा तळहात उजव्या पाऊलाला लावा. जेवढा जलद शक्य होईल, तेवढा जलद हा व्यायाम करा.
व्यायाम २
दुसऱ्या व्यायाम प्रकारातही भाग्यश्रीने जबरदस्त व्यायाम केला आहे. यासाठी दोन्ही हात दोन्ही बाजूंनी पसरवा आणि सरळ रेषेत ठेवा. यानंतर उजव्या पाय वर करून उजवा तळपाय डाव्या हाताला तर त्यानंतर डावा तळपाय उजव्या हाताला लावण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीमध्ये तुमचे शरीरही डावीकडे- उजवीकडे अशा हालचाली करते.
व्यायाम ३
तिसऱ्या प्रकारचा व्यायाम तिने तळहात आणि तळपाय जमिनीवर टेकवून प्लँक पोझिशनमध्ये केला आहे. यामध्ये एकानंतर एक तळपाय दोन्ही हातांच्या मधोमध घेऊन ती पायाची आणि शरीराची वेगवान हालचाल करत आहे.
व्यायाम ४
हा व्यायाम करण्याचा तिचा वेग पाहून तर ती पन्नाशीच्या आसपास पोहोचली आहे, असं वाटतंही नाही. एवढा तिचा जबरदस्त फिटनेस आहे. एक बेंच मध्ये ठेवून ती तळहाताने त्यावर जोर देते आहे आणि संपूर्ण शरीर बेंचच्यावरून एकदा डावीकडून उजवीकडे तर एकदा उजवीकडून डावीकडे करत आहे.