बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या चूलबुली अदांसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र जरी असली तरी ती स्वतःसाठी वेळ काढते. अनुष्काला फिट राहायला आवडते. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक योगासने आणि व्यायाम करताना दिसून येते. सोशल मीडियावर यासंदर्भात ती पोस्ट देखील शेअर करत असते.
अनुष्काची एक नवीन फिटनेस पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात ती योगाद्वारे स्वतःला फिट ठेवताना दिसत आहे. यात तिने चक्रासन हा योग केला आहे. या व्यायामाची अवघड पोझ करतानाचा एक फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे. या योगाचे अनेक फायदे आहेत. आपण देखील स्वतःला फिट ठेवण्यासाठी हा योग करू शकता.
चक्रासन म्हणजे काय?
चक्रसन हे दोन शब्दांनी बनलेले आहे, चक्र म्हणजे चाक आणि आसन म्हणजे योग मुद्रा. या आसनाच्या अंतिम आसनात शरीर एक चाकासारखे दिसते. त्यामुळे या योगाला चक्रासन असे म्हणतात. जर आपल्याला तारुण्य टिकवायचे असेल तर नक्कीच या योगचा नियमित सराव करा. या योग साधनेनंतर धनुरासन केले पाहिजे जेणेकरून शरीर संतुलित राहील.
चक्रासन करण्याचे फायदे
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी चक्रासन हा एक उत्तम योग आहे. चक्रसनाचे काही आरोग्य फायदे खालीलप्रमाणे:-
पोटातील चरबी कमी करण्यासाठी मदतगार
कंबर मजबूत करते
मांड्यांची चरबी कमी होते
चेहऱ्यावरील तुकतुकीतपणा टिकवण्यासाठी मदत
पचनशक्ती मजबूत होते
फुफ्फुसांना निरोगी ठेवते
केसांसाठी उपयुक्त
तणाव दूर होतो
चक्रासन कधी करावे?
चक्रासन करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी. उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यानंतर चक्रासन करणे फायदेशीर. परंतु थेट चक्रासन करू नये, चक्रासन करण्यापूर्वी कंबरेचा हलका व्यायाम करावा, त्यानंतरच हे आसन करा.