Join us  

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2024 7:50 PM

Chapati Diet For Quick Weight Loss - A Dietary Guide : पोळ्या पचत नसतील तर; कणिक मळताना ३ पैकी १ पदार्थ घाला..

वजन कमी करण्याचा विचार जेव्हाही मनात येतो, तेव्हा आपण आहारातून सर्वात आधी चपाती आणि भात वगळतो (Chapati). पण चपाती खाणं बंद केल्याने खरंच वजन कमी होते का? पोळी आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असते, आणि प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असते (Weight Loss). आपल्या शरीरासाठी प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहाइड्रेट खूप महत्वाचं आहे (Fitness).

शरीराला इतर कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. जी आपल्याला अन्नामधून मिळते. कार्बोहायड्रेटची गरज भागवण्यासाठी आपण आहारात चपाती आणि भाताचा समावेश करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते लोक कार्बोहायड्रेट कमी आणि प्रोटीन इनटेक वाढवतात. जर आपल्याला चपाती खाऊनही वेट लॉस करायचं असेल तर, कणिक मळताना त्यात ३ गोष्टी मिसळा. यामुळे नक्कीच वेट लॉससाठी मदत होईल(Chapati Diet For Quick Weight Loss - A Dietary Guide).

कणिक मळताना त्यात घाला ३ गोष्टी

सोया चंक्स

सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वेट लॉसही होते. दीर्घकाळ पोट भरलेले राहते. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, कणिक मळताना त्यात सोया चंक्सची पावडर घालून पोळ्या तयार करा. या पोळ्या खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारेल.

मेहेंदीचा रंग फिकट - डिझाईनही जमत नाही? ४ ट्रेण्डी सोप्या डिझाईन्स; हात दिसतील सुंदर

जिरे

जिरे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रथिने, ऊर्जा, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई असते. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. आपण कणिक मळताना जिरे पावडर घालू शकतो. यामुळे चयापचय वाढू शकते.

शाहरुख खान रोज फक्त ४ -५ तासच झोपतो अशी चर्चा, आरोग्यासाठी कमी झोप त्रासदायक की..

मेथी दाणे

मेथी दाण्यांमध्ये लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारखे पौष्टीक घटक असतात. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थितरीत्या पचते. आपण मेथी दाण्याची पावडर कणकेत मळून पोळ्या तयार करू शकता. यामुळे वेट लॉस होईल.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स