Join us

शरीर सुबक पण मांड्या बेढब? हे ४ उपाय पाहा.. मांड्यांची चरबी पटापट कमी होईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 16:44 IST

Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly : मांड्यांची चरबी होईल गायब. पाय दिसतील छान सुबक पाहा काय कराल.

जीवन आनंदाने तसेच कोणत्याही आजाराविना व्यतीत करायचे असेल तर, आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे असते. त्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. (Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly)घरी तयार केलेले पौष्टिक अन्न खाणे गरजेचे असते. विविध फळे तसेच भाज्या खाणे, इतरही आरोग्यासाठी चांगले असे पदार्थ खाणे गरजेचे असते. रोज किमान तासभर तरी व्यायाम करायला हवा. शरीर योग्य आकारातच असायला हवे. बेढब शरीर असेल तर अनेक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आयुष्यामध्ये गती राहत नाही. आळस वाढतो. (Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly)कामातील वेग कमी होतो. झोपेचाही त्रास सुरू होतो. शरीरापासून सुरू झालेल्या या त्रासाचा परिणाम मानसिकतेवरही होतो. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते. 

काही जणांचे हात, पोट, कंबर सगळं छान आकारात असतं. मात्र त्यांच्या मांड्या फार मोठ्या असतात. खास म्हणजे महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. मांड्यांचा आकार फारच विचित्र असतो. चालताना पायांवर ताण येतो. यामागे अनेक कारणे असतात. बैठ्या जीवनशैलीमुळे असा त्रास होतो. (Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly)मेडीसिन नेटसारख्या साईट्सवर सांगितल्यानुसार, आजकाल तासंतास लॅपटॉपसमोर बसून काम केले जाते. त्यामुळेही चरबी वाढते. महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळेही मांड्यांची चरबी वाढते. यासाठी काही उपाय आहेत ते करून बघा.

१. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी पोहणे हा उत्तम उपाय आहे. पोहताना पायांचा व्यायाम होतो. तसेच मांड्यांवर ताण येतो. त्यामुळे पोहण्याने मांड्या कमी होतात. 

२. सायकल चालवणे हा ही एक मस्त उपाय आहे. चढामध्ये किंवा सपाट रस्त्यावर सायकल चालवायची. किमान तासभर रोज सायकल चालवल्यावर मांड्यांचा आकार हळूहळू कमी होईल. 

३. बैठका मारल्याने मांड्या बारीक होतात. जोर बैठका हा तालमीतील व्यायाम प्रकार आहे. वर्षानुवर्षे भारतामध्ये हा व्यायाम प्रकार लोक करत आले आहेत. या व्यायामामुळे पायांची चरबी कमी होते आणि पाय मजबुत होतात.         

४. काही योगासने आहेत, जी केल्याने मांड्या कमी होतात. अगदीच सोपा पर्याय म्हणजे वर्जासनामध्ये बसणे. गप्पा मारताना किंवा काम करताना मध्येच थोडावेळ वर्जासनामध्ये बसायचे. सुरवातीला अगदी २ मिनिटे बसायलाही त्रासदायक वाटेल. मात्र हळूहळू सवय होईल. वर्जासन कधीही कुठेही करता येते. 

टॅग्स :फिटनेस टिप्समहिलाआरोग्यवेट लॉस टिप्स