Lokmat Sakhi >Fitness > फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

Cholesterol Control Tips By Ramdev Baba : रिसर्चनुसार रोज लसूणाची अर्धी किंवा  पूर्ण पाकळी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल जवळपास १० टक्क्यांनी कमी होते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:33 PM2024-02-25T12:33:52+5:302024-02-25T13:15:02+5:30

Cholesterol Control Tips By Ramdev Baba : रिसर्चनुसार रोज लसूणाची अर्धी किंवा  पूर्ण पाकळी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल जवळपास १० टक्क्यांनी कमी होते

Cholesterol Control Tips By Ramdev Baba : According To The Baba Ramdev Garlic Cure Cholesterol Problem | फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

कोलेस्टेरॉल लेव्हल वाढणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतं. (Health Tips) हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे उद्भवू शकतात.  अनेक संशोधनातून असं दिसून येतं की चांगला आहार आणि नियमित व्यायाम केल्याने कोलेस्टेरॉल  कमी करता येऊ शकतं. (Cholesterol Control Tips)बाजारात वेगवेगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध होतात. 

योगगुरू रामदेव बाबांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. (According To The Baba Ramdev Garlic Cure  Cholesterol Problem)  अभ्यासातून असं दिसून येतं की लसूण पावडर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात प्रभावी ठरते.  संशोधकांनी उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीत कच्चा लसूण खाण्याला प्राधान्य दिले आहे. (How to Control Cholesterol)

लसणाचे सेवन कसे करावे? (How To Eat Garlic For Cholesterol Control)

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार आपल्या किचनमध्ये वापरला  जाणारा लसूण कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. (ref) हार्ट डिसीजपासून बचाव होतो. रिसर्चनुसार रोज लसणाची अर्धी किंवा  पूर्ण पाकळी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल जवळपास १० टक्क्यांनी कमी होते. संशोधकांनी हृदयाच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी रोज १ चमचाभर लसूण आणि लिंबाचा रस घेण्याचा सल्ला दिला. ज्या लोकांना लसूणाचा स्वाद आवडत नाही ते लसणाबरोबर मधाचे सेवन करू शकतात. 

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

लसूण कोलेस्टेरॉल कमी करण्यात फायदेशीर ठरते.  लसूण प्रभावी उपाय आहे. कच्च्या लसणाच्या  बल्बमध्ये एलीन नावाचे पदार्थ असतो. हवेच्या संपर्कात आल्याने एलिन सल्फर संयुगात रुपांतर होते. ज्याला एलिसिन म्हणतात. एलिसिन लसणाला विशिष्ट टेक्स्चर देतो.

लसूण कोलेस्टेरॉलची कमी करण्यास फायदेशीर (Weight Loss Tips)

बाबा रामदेव सांगतात की लसूण खाऊन कोलेस्टेरॉल कंट्रोल ठेवता येतं. कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवू नये यासाठी नियमित स्वरूपात याचे सेवन करू शकता. लसूणात एलिसिन आणि मँगनीज असते. कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. लसणात एंटी व्हायरल, एंटी फंगल गुण असतात.

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे आजारांपासून बचाव होतो.  सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कमी सॅच्युरेडेट फूड, ट्रांन्स फॅट, मीठ, एडेड शुगर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नका. हाय फायबर पदार्थांचा आहारात समावेश करा. 

Web Title: Cholesterol Control Tips By Ramdev Baba : According To The Baba Ramdev Garlic Cure Cholesterol Problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.