वजन कमी (Weight Loss) करण्याचे अनेक फंडे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पण प्रत्येक उपाय वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतीलच असे नाही. वजन कमी करताना व्यायाम आणि डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पण यासह उलट सुलट पदार्थ खाणं देखील वेळीच टाळायला हवे. कारण तळकट-मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही वजन वाढते. काही लोकं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांना फॉलो करतात. पण यामुळे वजन कमी होईलच असे नाही.
जर आपले वजन व्यायाम आणि डाएटवर कण्ट्रोल ठेवूनही कमी होत नसेल तर, दालचिनी आणि लिंबाचं पाणी पिऊन पाहा (Fitness). या वेट लॉस ड्रिंकमुळे वजन तर, कमी होतेच शिवाय इतरही फायदे शरीराला मिळतात (Weight Loss Drink). वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि लिंबाचं पाणी कसे तयार करायचे? याबद्दलची माहिती फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट रचना मोहन यांनी दिली आहे(Cinnamon and Lemon for Belly Fat).
वजन कमी करताना दालचिनी आणि लिंबू कसे मदत करते?
- दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
- दालचिनीमध्ये चयापचय वाढवणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे पचन सुधारते, यासह वजन कमी करण्यास मदत करते.
साठीनंतरही संगीता दिसते फिट अँड ब्यूटीफुल, दुपारच्या जेवणात खाते बाजरीची भाकरी, वजन कमी करायचं तर..
- आहारात दालचिनीचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
- लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासह शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या.
- लिंबू नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. जे लिव्हरचे आरोग्य सुधारते. शिवाय वजन कमी करण्यास मदत करते.
वेट लॉस ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
लिंबाचा रस
दालचिनी
ना व्यायाम-ना डाएट, फक्त उकळत्या पाण्यात ४ पैकी १ मसाला घालून प्या, काही दिवसात दिसेल फरक
पाणी
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. ५ मिनिटांसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात २ चमचे लिंबाचा रस किंवा लिंबाच्या फोडी घालून उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व चहाच्या गाळणीने पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्या. अशा प्रकारे वेट लॉस ड्रिंक पिण्यासाठी रेडी. आपण हे पाणी उपाशी पोटी पिऊ शकता. जर आपल्याला उत्तम रिझल्ट हवे असेल तर, व्यायाम केल्यानंतर हे वेट लॉस ड्रिंक प्या. यामुळे नक्कीच वजन कमी करण्यास मदत होईल.