Lokmat Sakhi >Fitness > पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी किचनमध्ये ठेवलेले काही मसाले फायदेशीर ठरतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:38 AM2024-06-13T11:38:24+5:302024-06-13T18:39:17+5:30

Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी किचनमध्ये ठेवलेले काही मसाले फायदेशीर ठरतील.

Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : How To Use Turmeric To Losse Weight And Burn Belly Fat | पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

पोट आणि कंबरेजवळ चरबी जमा होण्याची अनेक कारणं असू शकतात. स्ट्रेस, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली, हॉर्मोनल इंब्लेंन्स  या कारणांमुळे पोट सुटायला सुरूवात होते. (Weight Loss Tips) बेली फॅट कमी  करण्यासाठी सगळ्यात आधी हे समजणं गरजेचं आहे की लटकणारं पोट कमी होण्यासाठी काय करता येईल.

बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी किचनमध्ये ठेवलेले काही मसाले फायदेशीर ठरतील. याव्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून तुम्ही वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. एक्सपर्ट्सच्या मते या २ मसाल्याचे पाणी प्यायल्याने तब्येतीवर चांगला परिणाम होईल. डायटिशियन मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Weight Loss Tips) 

बेली फॅट कमी करण्यासाठी हळदीचं पाणी प्या (Turmeric Water For Belly Fat)

रिसर्चनुसार हळदीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, शरीराचा मेटाबॉलिझ्म वाढतो आणि वाढत्या वजनावर नियंत्रण राहते. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचं पाणी पिऊ शकता. रिकाम्या पोटी  हळदीचं पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते.  हळद गरम असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हळदीचे सेवन करणं टाळायला हवं.

हळदीत करक्यूमिन असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगाने वाढते आणि फॅट टिश्यूज कमी होण्यास मदत होते. कच्च्या हळदीचा तुकडा पाण्यात  घालून उकळवून घ्या. कच्च्या हळदीचा छोटा तुकडा पाणी अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या. अर्ध झाल्यानंतर ते गाळून घ्या. (Ref) त्यानंतर यात चुटकीभर काळी मिरी आणि लिंबाचा रस मिसळा, लिंबाचा रस आणि काळी मिरी चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरते. म्हणूनच रिकाम्या पोटी हे ड्रिंक घ्या.  रोज न पिता आठवड्यातून  ३ वेळा हे ड्रिंक प्या. 

बेली फॅट कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी

एक्सपर्ट्सच्या मते झोपताना दालचिनीचं पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. दालचिनीत इंफ्लेमेशन कमी असते याशिवाय इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारते. इंसुलिन रेजिस्टेंस पोटाची चरबी कमी न होण्याचं मुख्य कारण आहे. दालचिनीमुळे ब्लड शुगर लेव्हल मॅनेज होण्यास मदत होते.

एक ग्लास पाण्यात एक चतृथांश इंच  दालचिनीचा तुकडा घाला, हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या,  झोपताना हे पाणी प्या ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे संपूर्ण शरीराचे वजन कमी होण्यासही मदत होईल. बेली फॅट कमी करण्यासाठी २ मसाल्याचे पाणी पिऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. 

Web Title: Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : How To Use Turmeric To Losse Weight And Burn Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.