प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. कोणाचं कमी खाल्लं तरी वजन वाढतं. तर कोणाचं काहीही खा, तरी वजन वाढत नाही. सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे शरीरात इतर आजार देखील उद्भवतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोकं विविध उपाय करून पाहतात. काही उपायांमुळे वजन कमी होते, तर काही उपाय फेल ठरतात. वजन कमी करण्यासाठी आपण एक स्वस्त आणि मस्त उपाय करू शकता. ते म्हणजे दालचिनीचा वापर. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दालचिनी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी म्हणतात, ''दालचिनीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, ज्याचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो. दालचिनी लठ्ठपणा आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने चयापचय सुधारते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी घटते. दालचिनी भूक कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते''(Cinnamon for weight loss: How to make cinnamon tea to lose weight).
करायचं काय?
१. कॉफीत चिमूटभर दालचिनी पावडर
जर तुम्हाला कॉफी पिण्याची आवड असेल तर कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण कॉफीमध्ये दालचिनी घालत असाल तर साखर टाळा.
काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं..
२. दालचिनी चहा
दालचिनी चहा बनवण्यासाठी एका भांड्यात २ कप पाणी घ्या, त्यात आलं घालून पाणी उकळवत ठेवा. उकळी आल्यानंतर त्यात अर्धा चमचा ग्रीन टी, व अर्धा इंच दालचिनी घालून मिक्स करा. चहाला उकळी आल्यानंतर चहा गाळून एका कप मध्ये ठेवा. त्यावर एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा.
तुम्हालाही सतत पाय हलवण्याची सवय आहे का? तुम्ही रेस्टलेस सिंड्रोमने आजारी तर नाही..
३. दालचिनी घालून उकळलेले पाणी प्या
मधुमेह असल्यास हे पाणी नियमित प्या. यासाठी एक कप पाणी उकळवत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तीन चमचे दालचिनी पावडर मिसळा. हे पाणी दिवसभरात तीनवेळा पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.