Lokmat Sakhi >Fitness > वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की थंड? डॉक्टर सांगतात कोणते पाणी कधी आणि केव्हा प्यावे..

वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की थंड? डॉक्टर सांगतात कोणते पाणी कधी आणि केव्हा प्यावे..

Cold Water Vs Warm Water – Which One Should You Drink after Workout : वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम करतोच, पण व्यायाम केल्यानंतर पाणी कधी प्यावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 06:41 PM2023-12-27T18:41:17+5:302023-12-27T18:47:19+5:30

Cold Water Vs Warm Water – Which One Should You Drink after Workout : वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम करतोच, पण व्यायाम केल्यानंतर पाणी कधी प्यावे?

Cold Water Vs Warm Water – Which One Should You Drink after Workout? | वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की थंड? डॉक्टर सांगतात कोणते पाणी कधी आणि केव्हा प्यावे..

वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की थंड? डॉक्टर सांगतात कोणते पाणी कधी आणि केव्हा प्यावे..

वॉक केल्याने फक्त वजन कमी होत नसून, याचे इतरही फायदे आहेत. शारीरिक यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित वॉक करणं गरजेचं आहे. काही जण सकाळी वॉक करतात. ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, ते रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला जातात. उत्तम हेल्थसाठी आपण जितकं चालाल तितके चांगले आहे. यामुळे मानसिक यासह शारीरिक आरोग्य सुदृढ राहते.

नियमित व्यायाम, योग आणि वॉक केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. व्यायाम केल्यानंतर बरेच जण पाणी पितात. पण वॉक केल्यानंतर पाणी पिण्याची देखील एक पद्धत आहे. खरंतर, या ऋतूमध्ये लोकांना गरम पाणी प्यावं की थंड हे समजत नाही. याविषयी चॅरिटेबल हॉस्पिटलचे आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी माहिती दिली आहे(Cold Water Vs Warm Water – Which One Should You Drink after Workout).

हिवाळ्यात वर्कआउट केल्यानंतर पाणी कसे प्यावे?

डॉक्टरांच्या मते, 'हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे दिवसभर कोमट पाणी प्यावे. वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर शरीरात उष्णता जाणवते. त्यामुळे बरेच जण थंड पाणी पितात. पण वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्सवरही परिणाम होतो. जेव्हा आपण वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पितो तेव्हा, शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे कधीही व्यायाम किंवा वॉक करून याल तेव्हा, कोमट पाणी प्या. यामुळे इतर आजार होणार नाही, शिवाय पचनक्रियाही सुधारेल.'

वर्कआउट केल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे

- वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर घाम येतो. ज्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते. आशावेळी कोमट पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्याने शरीर अधिक काळ हायड्रेट राहील.

- वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर  कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

- कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

युरिक ऍसिड वाढले असेल तर डाळी खाणे पूर्ण बंद करावे का? डॉक्टर सांगतात..

- कोमट पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय पचनक्रिया सुधारते.

-  व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो.

- व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. 

Web Title: Cold Water Vs Warm Water – Which One Should You Drink after Workout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.