Join us  

सकाळी चालायला जाता तरी वजन घटत नाही? चालताना ५ टिप्स लक्षात ठेवा-लवकर फिट व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:02 PM

Common brisk walking mistakes to avoid : सकाळी चालल्यानं संपूर्ण दिवस शरीर एक्टिव्ह राहते आणि शरीर एर्नेजेटिक राहण्यास मदत होते.

रोज सकाळी चालल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. वजन कमी करण्यापासून ब्लड प्रेशर, शुगर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत मॉर्निंग वॉकमुळे ओव्हरऑल शरीर चांगले राहण्यास मदत होते. मॉर्निंग वॉक फक्त फिजिकल फिटनेससाठीच नाही तर मेंटल हेल्थसाठीही गरजेचा असतो. (Walking Mistakes You Didn't Know You Were Making)

सकाळी चालल्यानं संपूर्ण दिवस शरीर एक्टिव्ह राहते आणि शरीर एर्नेजेटिक राहण्यास मदत होते. पण मॉर्निग वॉकला जाताना लोक बऱ्याच चुका करतात त्यामुळे मॉर्निग वॉकचा फायदा मिळत नाही. अशा कोणत्या चुका आहेत ज्या मॉर्निंग वॉकला जाताना टाळायला हव्यात  ते समजून घेऊया. (Common brisk walking mistakes to avoid)

१) जर तुम्ही मॉर्निग वॉकला जाण्याआधी हेवी ब्रेकफास्ट करत असाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही आणि तुम्ही लवकर थकाल. दिवसभर सुस्ती जाणवेल.  मॉर्निग वॉकच्या आधी हेवा नाश्ता न करता भिजवलेले ड्रायफ्रुट्स, एक सफरचंद आणि ब्लॅक कॉफी असे पदार्थ घेऊन जा.

२) बरेच लोक मॉर्निग वॉकला जाण्याआधी पाणी पित नाहीत. पण सकाळच्या वेळी शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते.  कारण रात्रभर झोपल्यानंतर त्या वेळेत आपण पाणी पित नाही. याच कारणामुळे सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यायला हवं. नंतर मॉर्निंग वॉकला जा.

३) चालायला जाताना अनकंफर्टेबल फूटवेअर्स घालण्याची चूक करू नका. कारण खराब फुटवेअरर्समुळे तुमचा मॉर्निंग वॉक व्यवस्थित होणार  नाही आणि सतत बुटांकडे लक्ष जाईल. दुखापत होण्याचीही शक्यता असते. चुकीचे फुटवेअर्स वापरल्यानं मसल्स आणि गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात.

४) वॉक करताना वॉर्मअप करायला विसरू नका. लोक मॉर्निग वॉकला वॉर्मअप न करताच जातात, जे चुकीचं आहे. वॉर्मअप केल्यानं शरीराचे व्यायाम करण्याची क्षमता वाढते. जखम होण्याची शक्यता कमी होते.

५) नॅशनल हेल्थ सर्विसनुसार एका दिवसात ३० मिनिटांचे वॉकिंग उत्तम ठरते. रोज ३० मिनिटं वॉक करून तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता. जास्त वेगात किंवा  जास्त स्लो न चालता तुम्ही मध्यम वेग पकडत चालायची सवय ठेवा. वजन कमी करण्यासाठी सकाळी चालावं पण जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चालू शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स