सुर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम मानला जातो. याचाच अर्थ असा की इतर कोणताही व्यायाम न करता केवळ सुर्यनमस्कार जरी रोज नियमितपणे केले तरी शरीराला भरपूर फायदा होतो. सुर्यनमस्काराच्या ज्या स्टेप्स आहेत, त्या करताना संपूर्ण शरीराचाच व्यायाम होतो. त्यामुळे सुर्यनमस्काराला एक परिपूर्ण व्यायाम मानले जाते. पण बऱ्याचदा अनेक जण नकळतपणे सुर्यनमस्कार करताना काही चुका करतात (Common mistakes must be avoided while practicing surya namaskar). या चुका केल्याने एक तर शरीराचे नुकसान होते किंवा मग सुर्यनमस्कार करण्याचा पाहिजे तसा फायदा शरीराला होत नाही. त्यामुळेच एकदा सुर्यनमस्कार करताना होणाऱ्या 'कॉमन' चुका नेमक्या कोणत्या ते पाहून घ्या आणि तुमच्याकडून तर त्या होत नाहीत ना हे एकदा तपासा.(How to do surya namaskar properly?)
सुर्यनमस्कार करताना होणाऱ्या चुका
१. सुर्यनमस्काराच्या दुसऱ्या स्टेपमध्ये दोन्ही हात वर केले जातात. ही स्टेप करताना अनेक जण डोके पुर्णपणे मागच्या बाजुने झुकवतात आणि हात मात्र तसेच समोर राहतात. असं करणं टाळा. डोके हे नेहमी दोन्ही हातांच्या मधेच असावे. हात जेवढे मागे जातील तेवढेच मागे डोके न्यावे.
'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती
२. तिसरी स्टेप करताना आपण दोन्ही हात खाली करून जमिनीला लावतो. असे करताना अनेक जण पाठ वाकवतात. पाठीला गोलाकार येतो. असं करू नये. खाली वाकताना कंबरेतून खाली वाका आणि पाठीचा कणा तसेच खांदे ताठ ठेवा.
३. चौथी स्टेप करताना एका तळपायाचे पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये असते, तर दुसरा तळपाय मागे असताे. जो तळपाय दोन्ही हातांच्यामध्ये आहे, त्या पायाचा गुडघा आणि घोटा एका सरळ रेषेत असावे. अनेकदा घोटा मागे असतो आणि गुडघा पुढे झुकलेला असतो.
टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय
४. यानंतर सहावी स्टेप करताना अनेक जण खांदे झुकवतात. असं न करता खांदे सरळ आणि ताठ ठेवावे.
५. यानंतर जी पर्वतासनची पोझिशन येते, ती करताना दोन्ही तळपायांत अंतर ठेवू नये. तळपाय जोडून घ्यावे आणि टाच जमिनीला टेकलेली असावी.