Lokmat Sakhi >Fitness > Constipation Relieving Tips : गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ८ टिप्स, काही सेकंदात दूर होईल गॅस, एसिडीटी

Constipation Relieving Tips : गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ८ टिप्स, काही सेकंदात दूर होईल गॅस, एसिडीटी

Constipation Relieving Tips : जास्त जेवण झालं किंवा जेवणाची वेळ चुकली की असा त्रास उद्भवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:43 PM2022-11-20T13:43:43+5:302022-11-20T14:01:35+5:30

Constipation Relieving Tips : जास्त जेवण झालं किंवा जेवणाची वेळ चुकली की असा त्रास उद्भवतो.

Constipation Relieving Tips : Constipation relieving tips diy home remedies to relieve constipation naturally | Constipation Relieving Tips : गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ८ टिप्स, काही सेकंदात दूर होईल गॅस, एसिडीटी

Constipation Relieving Tips : गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ८ टिप्स, काही सेकंदात दूर होईल गॅस, एसिडीटी

गॅस, एसिडीटी होणं सध्याच्या जीवनशैलीच खूपच कॉमन झालंय. पचनक्रियेशी निगडीत त्रासांमुळे ही समस्या वाढत जाते. सतत गॅस होत असेल तर तुम्हाला जेवणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (Constipation Relieving Tips) अनेकांना गॅसमुळे डोकेदुखी होते, कोणाचं सकाळी पोट साफ होत नाही तर कोणाला एसिडीटी. जास्त जेवण झालं किंवा जेवणाची वेळ चुकली की असा त्रास उद्भवतो. (Constipation relieving tips diy home remedies to relieve constipation naturally)

गॅस होण्याची कारणं

1) कफ होण्याची अनेक कारणं आहेत. दैनंदिन जीवन आणि  आहाराशी निगडीत बदल. 

2) जेवणात फायबर्सचा अभाव, कमी जेवणं.

3) हिरव्या भाज्या, ताजी फळं न खाल्ल्यानं गॅस होतो. 

4) सतत मैद्यापासून तयार झालेले पदार्थ खाल्लानं पचनक्रिया बिघडते.

5) जे लोक पाणी कमी पितात त्यांना गॅसचा त्रास  जाणवतो. 

6) तेलकट पदार्थ, फास्ट फूडमुळे कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. 

7) जे लोक कॅफेनचे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांनाही गॅस होतो. 

8) शारीरिकदृष्या कमी एक्टिव्ग असलेल्यांना हा त्रास उद्भवतो. 

बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी आहारात काय बदल करावेत?

1) बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यास पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे आणि कॉफी, चहा, कोल्ड्रिंक्सचे सेवन बंद करणे.

2) चपाती आणि भातापेक्षा कोशिंबीर आणि हिरव्या भाज्या जास्त खा.

3) रात्रीच्या जेवणात गॅस वाढवणाऱ्या गोष्टी खाणे टाळा कारण त्या पचनशक्तीनुसारही जड असतात. जसे, चणे, हरभरा, राजमा, उडीद, डाळ मखनी, चना डाळ इ.

4) रात्रीच्या जेवणासाठी खिचडी खाणे हा उत्तम पर्याय आहे.

5) रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, तर कमीत कमी ३० मिनिटे सावकाश चालत जा.

घरगुती उपाय

1) थंडीत मेथीचे सेवन करा. रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजत ठेवा आणि ही मेथी सकाळी रिकाम्या पोटी चघळून  खा आणि ताजे पाणी प्या. पोट स्वच्छ राहील.

2) रात्री झोपण्यापूर्वी रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी एक ग्लास दूध प्या. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी दूध उपयुक्त आहे.

3) रात्री जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत सेवन करा यामुळे सकाळी पोट साफ होईल.

4) सकाळी लवकर उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी सेवन करा.

Web Title: Constipation Relieving Tips : Constipation relieving tips diy home remedies to relieve constipation naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.