कोरोना व्हायरसची दुसरी लाट शांत झाल्याचे दिसून आल्यानंतर, लोक पुन्हा साधे जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परंतु कोरोनाचा केवळ लोकांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला नाही तर यामुळे लोक मानसिकरित्याही आजारी पडले आहेत. त्याच वेळी, बरेच लोक आहेत जे कोविडमधून रिकव्हर झाले आहेत पण त्यांच्या शरीराला सुज आल्याचं दिसून आलं आहे.
कोविडातून बरे झाल्यानंतर सर्वात मोठी गुंतागुंत म्हणजे हृदयविकाराचा झटका. कोरोनाच्या साथीने बरे झाल्यानंतरही लोकांना हृदयाशी संबंधित अडचणी येत आहेत. देशातील अनेक प्रसिद्ध डॉक्टर या समस्यांचे सविस्तर उत्तरे देत आहेत. कोविड मधून बरे झाल्यानंतरही हा विषाणू हृदयावर का हल्ला करत आहे याबाबत डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हार्ट अटॅक का येत आहे?
कोरोना व्हायरसचा संसर्ग बरा झाल्यानंतर लोकांना नॉर्मल लाईफ जगावसं वाटतं. त्यानंतर लोक व्यायामासोबतच आपली नेहमीची कामं करायला सुरूवात करतात. परंतु अलीकडेच नव्याने उद्भवणार्या समस्यांमध्ये लोकांना हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यामुळे बर्याच लोकांनी व्यायाम करणे किंवा शारीरिक हालचाली पूर्णपणे बंद केल्या आहेत. कोरोनातून बरं झालेल्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यापैकी काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा तज्ज्ञांनी प्रयत्न केला आहे.
मृत्यूचे मुख्य कारण काय आहे?
कोरोनातून बरं झालेल्या लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याबाबत पीडी हिंदुजा रुग्णालय आणि एमआरीसीमधील सल्लागार कार्डियोलॉजिस्ट आणि कार्डियक इलेक्ट्रो फिजियोलॉजिस्ट डॉक्टर अमेय उदयवर यांनी सांगितले की, कोरोनातून बरं झाल्यानंतर मृत्यू होण्याचं सगळ्यात सामन्य कारण हार्ट अटॅक आहे. रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले असेल किंवा ब्लॉकेज १०० टक्के असेल तर हृदयात रक्ताची कमतरता भासते.
ज्यामुळे हृदयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे, कधीकधी हृदयाचे ठोके वेगवान होतात तर कधी थांबतात. यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. याशिवाय कधीकधी कोविडमुळे स्नायू समस्या देखील उद्भवू शकतात. याला मायोकार्डिटिस म्हणतात. यामुळे हृदयाची गती वाढू शकते अडथळा येऊ शकतो.
कोरोना श्वासांसंबंधी आजार असेल तरी त्याचा हृदयावरही परिणाम होत असतो. याबाबत कार्डियाक सर्जन डॉक्टर बिपिन कुमार दुबे यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांच्यामते कोरोना संक्रमणानंतर व्यक्तीच्या धमन्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो. याशिवाय हृदयाच्या मासंपेशी कमकुवत होण्याचा धोका असतो. त्याला कार्डियोमायोपॅथी असंही म्हणतात.
ज्या लोकांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे. डॉक्टर त्यांना अधिक सावध राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. तसेच, जर एखादी व्यक्ती आधीच हृदयरोगाने ग्रस्त असेल तर त्याने आपले औषध कोणत्याही प्रकारे थांबवू नये. या बरोबरच डॉक्टर बरे झालेल्या लोकांना व्यायामासह योग्य आहार घेण्याचा सल्लाही देत आहेत. कोविड मधून बरं झालेल्या रूग्णांना छातीत दुखणे, श्वास लागणे, वेगवान हृदयाचा ठोका, अचानक थकवा जाणवण्याची लक्षणे दिसू लागतात. म्हणून अशा परिस्थितीत वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि उपचारांच्या प्रक्रियेचे अनुसरण करा.
कोरोनातून बरं झाल्यावर व्यायाम कधी करायला हवा
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या मनात असा प्रश्न अनेकदा उद्भवतो. त्यांचा व्यायाम कधीपासून सुरू होईल. यावर डॉ. उदयवार यांचे म्हणणे आहे की चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर केवळ 10 ते 12 दिवसांनी व्यायाम सुरू केला पाहिजे. तसेच, हे लक्षात ठेवा की सुरुवातीला जास्त व्यायाम करू नका. जर आपल्याला व्यायामादरम्यान श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्वरित तपासणी करून घेणे देखील आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात, आपण केवळ चालणं किंवा साधे व्यायाम करायला हवेत.