आयुर्वेदात (Ayurveda) कढीपत्त्याला औषधी मानले गेले आहे. याव्यतिरिक्त कढीपत्त्याच्या वापरानं तुम्ही केस मुळापासून मजबूत बनवू शकता. कढीपत्त्याची पानं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कढीपत्त्याचा रस प्यायल्यानं लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. आचार्य बाळकृष्ण (Aacharya Balkrushna) यांनी सांगितले की कढीपत्ता जर तुम्ही आहारात घेतला तर गंभीर आजाराही दूर होतात. कढीपत्त्याच्या ज्यूस कसा बनवावा हा ज्यूस पिण्याचे फायदे काय ते समजून घेऊया. (Curry Leaves Are Very beneficial In Reducing Obesity Know How To Use Then To lose Weight)
कढीपत्त्यात व्हिटामीन्स, एंटी ऑक्सिडेंट्स असतात. याशिवाय व्हिटामीन बी२, व्हिटामीन बी१, व्हिटामीन ए असते. तसंच आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन्स यांसारखी मिनरल्स असतात. कढीपत्त्यात एंटी डायबिटीक, एंटी मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
रोज रिकाम्या पोटी कढीत्त्याचा रस प्यायल्यानं लठ्ठपणा कमी होतो. यामुळे शरीरातील चरबी हळू हळू वितळू लागते. कढीपत्त्यातील व्हिटामीन्स, मिनरल्स इम्यूनिटी वाढवतात आणि इम्यूनिटी वाढवून मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यासही मदत होते ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.
आयर्न आणि फोलिक एसिड शरीर डिटॉक्स करतात आणि टॉक्सिन्स बाहेर निघण्यासही मदत होते. पचनक्रिया चांगली राहते. गॅस, एसिडिटीची समस्या उद्भवत नाही. कढीपत्ता केसांच्या विकासासाठीही फायदेशीर ठरतो.
रश्मिका मंदानाचे १० सिल्क साडी लूक; लग्नाला जाताना नेसा या साड्या, सुंदर-आकर्षक दिसाल
कढीपत्त्याचा ज्यूस कसा बनवावा?
एका वाटीत धुतलेले कढीपत्ते घ्या. एका कढईत २ ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा पाणी व्यवस्थित उकळू लागेल तेव्हा त्यात कढीपत्ता घाला नंतर उकळून पाणी अर्ध राहील तेव्हा गाळणीनं गाळून घ्या. त्यात १ चमचा मध आणि लिंबाचा रस घाला तुम्ही कढीपत्त्याची पानं वाटूनही ज्यूस काढू शकता. यासाठी कढीपत्ता मिक्सरमध्ये घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिसळा. नंतर गाळणीनं गाळून ज्यूस काढा त्यात काळं मीठ आणि लिंबू घालून प्या.