Join us  

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 2:39 PM

Curry Leaves Chutney Recipe - Kadi Patta Chutney for Weight loss : 'या' हिरव्या पानांच्या चटणीमुळे बऱ्याच आरोग्याच्या समस्या सुटतील..

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. पण यामुळे वजन कमी होईलच असे नाही (Fitness). वजन कमी करण्यासाठी व्यायामासह डाएट देखील महत्वाचं आहे (Health Tips). पण तरीही हवा तसा रिझल्ट दिसून येत नाही. वेट लॉससाठी डाएटला खूप महत्व आहे. जर डाएट बिघडलं, तर व्यायाम करूनही वजन घटत नाही. मन मारून आपण बरेच पदार्थ खाणं टाळतो. जर आपण बेचव पदार्थ खाऊन वजन कमी करत असाल तर, असं करू नका, आपण आहारात कडीपत्त्याच्या चटणीचा समावेश करू शकता.

भारतीय घरांमध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यात फायबर्स आणि हायपोग्लायसेमिकगुण असतात. ज्यामुळे इन्शुलीन एक्टिव्हीटीज वाढतात आणि इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते(Curry Leaves Chutney Recipe - Kadi Patta Chutney for Weight loss).

याव्यतिरिक्त त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असते. यासह यात अनेक एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. नियमित कडीपत्ता खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होते. त्यामुळे आपण नियमित चमचाभर चमचमीत कडीपत्त्याची चटणी खाऊ शकता.

कडीपत्त्याची चमचमीत चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कडीपत्ता

शेंगदाणे

लसूण

लाल सुकी मिरची

जिरं

पांढरे तीळ

हिंग

सुकं खोबरं

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

आमचूर पावडर

मीठ

तेल

कृती

सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्त्याची पानं घालून भाजून घ्या. कडीपत्त्याची पानं कुरकुरीत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. कडीपत्ता भाजल्यामुळे त्यातील कडूपणा निघून जाईल.

आता त्यातच पुन्हा २ चमचे तेल घाला. नंतर त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून भाजून घ्या. नंतर त्यात ६ -७ लसणाच्या पाकळ्या, ४-५ लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या. नंतर त्यात २ चमचे जिरं, पांढरे तीळ घालून भाजून घ्या.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

नंतर गॅस बंद करा. आणि त्यात चिमुटभर हळद, किसलेलं सुकं खोबरं घालून साहित्य मिक्स करा. भाजलेलं सर्व साहित्य थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर घालून वाटून घ्या. अशा प्रकारे चमचमीत कडीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी. त्यात चटणी हवाबंद डब्यात साठवून ठेवा. ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास, महिनाभर आरामात टिकेल. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स