Lokmat Sakhi >Fitness > नवीन वर्षात जोरदार व्यायामाचा संकल्प केला, सुरुवातही केली? ३ गोष्टी करा, तरच व्यायाम सुरू राहील..

नवीन वर्षात जोरदार व्यायामाचा संकल्प केला, सुरुवातही केली? ३ गोष्टी करा, तरच व्यायाम सुरू राहील..

Fitness plan for new year: नववर्ष सुरु झालं की जीममध्ये, मैदानावर, योगा क्लासेसमध्ये खूप गर्दी दिसून येते, पण महिन्या दोन महिन्यात ही गर्दी ओसरू लागते. नववर्षाचा तुमचा फिटनेसचा, व्यायामाचा संकल्प बारगळू नये म्हणून व्यायामाला सुरुवात करताना या काही गोष्टींची काळजी घ्या. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 11:36 AM2022-01-01T11:36:37+5:302022-01-01T11:37:35+5:30

Fitness plan for new year: नववर्ष सुरु झालं की जीममध्ये, मैदानावर, योगा क्लासेसमध्ये खूप गर्दी दिसून येते, पण महिन्या दोन महिन्यात ही गर्दी ओसरू लागते. नववर्षाचा तुमचा फिटनेसचा, व्यायामाचा संकल्प बारगळू नये म्हणून व्यायामाला सुरुवात करताना या काही गोष्टींची काळजी घ्या. 

Decided to exercise hard in the new year, even started? Do 3 things, then the exercise will continue. | नवीन वर्षात जोरदार व्यायामाचा संकल्प केला, सुरुवातही केली? ३ गोष्टी करा, तरच व्यायाम सुरू राहील..

नवीन वर्षात जोरदार व्यायामाचा संकल्प केला, सुरुवातही केली? ३ गोष्टी करा, तरच व्यायाम सुरू राहील..

Highlightsव्यायामात असा खंड पडू द्यायचा नसेल तर व्यायाम सुरू करण्याआधी या काही गोष्टींची काळजी घ्या.. म्हणजे मग तुमच्या व्यायामातले सातत्य टिकून राहील. 

नव्या वर्षासाठी (new year fitness plan) बहुतेकांचे काही ना काही संकल्प असतात. यापैकी बहुतेक संकल्प हे व्यायाम, फिटनेस, डाएट (fitness and diet for new year) याबाबत असतात. १ जानेवारीपासून आपण सकाळी लवकर उठणार, भरपूर व्यायाम करणार, असं काय- काय खूप लोक ठरवतात. पण नंतर मात्र खूपच लवकर या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मग आपण व्यायाम करताना छोटा- मोठा ब्रेक घेण्याची संधी शोधू लागतो. 

 

हा ब्रेक कधीकधी इतका मोठा होऊन जातो की मग पुन्हा व्यायामाला सुरुवात करायला पुढच्या वर्षाच्या १ तारखेची वाट पहावी लागते. याविषयीचे अनेक मिम्स सोशल मिडियावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात व्हायरल झालेले असतात. हे मिम्स आपल्या बाबतीत किती खरे ठरले होते, याचा अनुभवही बऱ्यापैकी लोकांनी घेतलेला असतो. म्हणूनच तर आपल्या व्यायामाचं असं भजं होऊ द्यायचं नसेल, व्यायामात असा खंड पडू द्यायचा नसेल तर व्यायाम सुरू करण्याआधी या काही गोष्टींची काळजी घ्या.. म्हणजे मग तुमच्या व्यायामातले सातत्य टिकून राहील. 

 

१. सुरुवातीला करा रिलॅक्सिंग व्यायाम (start from relaxing exercise)
१ जानेवारीला अनेक जणांनी खूप दिवसांनी व्यायामाला सुरुवात केलेली असते. त्यामुळे एक्साईटमेंट जरा जास्त असते. या एक्साईटमेंटवर कंट्रोल ठेवा आणि सुरुवातीला काही दिवस अगदीच हलकाफुलका व्यायाम करा. वार्मअप एक्सरसाईज, स्ट्रेचिंग, वॉकींग असं करा. खूप हेवी एक्सरसाईज सुरुवातीला टाळा. त्यामुळे मग अंगही जड पडणार नाही, व्यायामचा त्रासही होणार नाही आणि नंतर दुसऱ्यादिवशी व्यायामासाठी उठण्याचा कंटाळाही येणार नाही. 

 

२. खूपच जास्त वेळ व्यायाम नको (workout for limited period)
खूप दिवसांनी व्यायाम करणार असाल, तर काही दिवस केवळ ३० मिनिटांसाठी व्यायाम करा. कारण खूप दिवसांपासून व्यायाम केलेला नसतो. त्यामुळे शरीराला सवय नसते. अशा वेळी जर अतिउत्साहाच्या भरात खूप वेळ व्यायाम केला तर लवकरच थकवा येऊ शकतो. एकदा थकवा आला की मग व्यायामासाठी कंटाळा केला जातो आणि मग हा कंटाळा वाढत जाऊन व्यायामात खूप मोठा गॅप पडतो.

 

३. योग्य वेळ निवडा (select proper timing for workout)
आपल्याला जी वेळ खरोखरंच सोयीची वाटत असेल, अशाच वेळी व्यायाम करायला हवा. काही जणं सकाळी लवकर व्यायामाला जाऊ असे ठरवतात. पण नेमका उठायला उशीर होत जातो आणि व्यायामात खंड पडतो. त्यामुळे इतरांच्या सांगण्यावरून किंवा इतर लोक केव्हा व्यायाम करतात, ते पाहून स्वत:ची वेळ ठरवू नका. जी वेळ आपल्याला खरंच सहज शक्य असेल ती वेळ व्यायामासाठी ठरवा. 

 

Web Title: Decided to exercise hard in the new year, even started? Do 3 things, then the exercise will continue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.